Pune Lonavala Local : CM फडणवीसांचा मोठा निर्णय! खासदार मोहोळ यांच्या पुढाकाराने पुणेकरांना मिळाली 'लोकल'ची गिफ्ट

Third And Fourth Railway Line Approved : पुणे-लोणावळा लोकलबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत लोकल नवीन मार्गीकेला मंजुरी देण्यात आली आहे.
Murlidhar mohol, Devendra Fadnavis
A view of Pune-Lonavala railway route, where the new third and fourth railway lines will ease congestion and enhance local train connectivity.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 20 Aug : पुणे-लोणावळा लोकलबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत लोकल नवीन मार्गीकेला मंजुरी देण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात नागरिकांकडून मागणी केली जात होती. पुणे-लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वे गाड्यांची कनेक्टिव्हिटी वाढावी आणि या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा द्यावा, यासाठी तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीगेसाठीच्या सुरू पाठपुराव्याला यश आले आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. केंद्र सरकारने या प्रकल्पाला आधीच सकारात्मकता दर्शवली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने याला मंजुरी दिल्याने पुणेकरांसाठी ही मोठी भेट असणार आहे.

Murlidhar mohol, Devendra Fadnavis
Contractors Protest : किती थकबाकी? 90 हजार कोटी! 35 जिल्ह्यांमध्ये आक्रोश, उपासमारीत असलेल्या कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ!

या प्रकल्पाचा खर्च केंद्र आणि राज्य सरकार समान करणार असून यासंदर्भात मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. तसेच पाठपुरावाही केला होता. आता राज्य सरकारच्या मंजुरीमुळे या दोन्ही मार्गीकांचा मार्ग मोकळा झाला असून यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 11 वर्षांत रेल्वेचे आधुनिकीकरण आणि मार्गांचा विस्तार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारले असून आवश्यक तेथे मार्गिकांची संख्याही वाढवली जात आहे. अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात अशा कामांनी आणखी वेग आलेला आहे.

Murlidhar mohol, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मुंबईत मोनोरेलमध्ये घडलेल्या थरारानंतर सरकारची धावपळ! मुख्यमंत्र्यांनीही उचलले मोठे पाऊल

पुणे-लोणावळ्यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असून तिसरी आणि चौथी मार्गीका झाल्यास यादरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. या दोन मार्गिकांमुळे रेल्वे गाड्यांची संख्याही वाढणार असून मालगाड्यांमुळे होणारी कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच एक्सप्रेस गाड्यांचा वेगदेखील वाढणार आहे.

याचा फायदा औद्योगिक, व्यावसायिक, नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे, असेही सांगत मोहोळ यांनी या मंजुरीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारला मनःपूर्वक धन्यवाद दिले असून या प्रकल्पाची पुढील प्रक्रियाही वेगाने होईल आणि सदर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com