The number of corona positive patients in the state has reached two lakh 12 thousand
The number of corona positive patients in the state has reached two lakh 12 thousand 
मुंबई

मुंबईतील कोरोना रुग्णांचा रोजचा आकडा धडकी भरवणारा...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबई (Mumbai) शहरात कोरोना संसर्ग (Corona) वेगाने पसरत असून आठवड्याभरात सक्रिय रुग्णांची संख्या चार पटीने वाढली आहे. परिणामी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढली असून रूग्णालयात दाखल करावे लागणारे रुग्ण देखील दुप्पट झाले आहेत. आज (आठ जानेवारी) रोजी 20 318 नवे रुग्ण आढळले आहेत. यातील दिलासा देणारी बाब म्हणजे 16 661 रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. आज आढळलेल्या रुग्णांपैकी 1257 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील फक्त 108 रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे.

कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. आठवड्याभरापूर्वी मुंबईत दररोज सरासरी ५ हजार बाधित सापडत होते,त्यात वाढ होऊन ही संख्या आता थेट २० हजारावर गेली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. १ जानेवारी रोजी मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या २२,३३४ होती. केवळ आठवडयाभरात त्यात चौपट वाढ होऊन ९१,७४१ वर पोचली.

मुंबई महानगरपालिकेकडून कोविड रुग्णांसाठी ३५,६४५ रुग्णखाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत.१ जानेवारी पर्यंत त्यातील २७६० (९ टक्के) रुग्णखाटा भरल्या होत्या. ७ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण तिपटीने वाढले. सध्या रुग्णालयांतील ६५३१ (१८.३ टक्के ) रुग्णखाटा भरल्या आहेत. कोविड बाधित होण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आहेत. दररोज जे बाधित रुग्ण आढळत आहेत त्यातील ८५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण एसिम्पटोमॅटिक आहेत. मुंबईत एकूण ८,७४,७८० बाधित रुग्ण असून ५,८९,१२० (६७.३४ टक्के) रुग्ण लक्षणे विरहित आहेत.

पुण्यातही रुग्णवाढीचा वेग कायम आहे. आठ जानेवारी रोजी पुण्यात दिवसभरात २४७१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली.

- दिवसभरात रुग्णांना ७११ डिस्चार्ज.

- पुणे शहरात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. एकूण ०३ मृत्यू.

-१२० रुग्णांवर ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

- इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- १९

- नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- १३

- पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५२२००६.

- पुण्यातील ॲअॅक्टिव्ह रुग्ण संख्या- ११५५०.

- एकूण मृत्यू -९१२६.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५०१३३०

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९१८६.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT