औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दोन दिवसांपुर्वी दिल्लीत जाऊन गळाभेट घेणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना ताप, सर्दीचा त्रास जानवत आहे. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना कोरोना संसर्गं झाल्याचे निदान कालच झाले, त्यानंतर सत्तार हे देखील आजारी आहेत. (Marathwada)
कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने चाचणी केल्याशिवाय आपण कुणालाही भेटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपण सध्या ताप आणि सर्दीने आजारी असल्याचे त्यांनी सांगतिले. सत्तार यांचे राजकीय विरोधक रावसाहेब दानवे यांची सत्तार यांनी दिल्लीत गळाभेट घेतली होती. ही भेट चांगलीच गाजली.
परंतु दिल्लीतून परल्यानंतर दानवे काल आपल्या मतदारसंघात फिरत होते, लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी त्यांनी गप्पा देखील मारल्या. परंतु कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी काल कोरोना चाचणी केली, तिचा अहवाल पाॅझीटीव्ह आला.
त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील दानवे यांनी केले होते. दरम्यान, सत्तार यांना देखील ताप आणि सर्दीचा त्रास जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चाचणी करून अहवाल आल्याशिवाय आपण कुणाला भेटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.