मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) आज मुंबईत होत आहे. या दोन्ही मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. (shiv sena Dasara Melava latest news)
राज्याच्या सत्तासंघर्षातला कळीचा मुद्दा ठरलेला दसरा मेळावा आज शिंदे गट आणि ठाकरे गट साजरा करत आहेत. एकमेकांवर शरसंधान, आरोप प्रत्यारोप, राजकीय तोफा आज शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर डागतील. (Dasara Melava latest news)
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा कुठे होणार या वादावर पडदा पडल्यानंतर, कोणाच्या गटाला सर्वाधिक गर्दी होणार याची चर्चा सुरु आहे. शिवाजी पार्कवर ठाकरी तोफ धडाडण्याआधी शिंदे गट आणि भाजपवर 'सामना' संपादकीयमधून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजप महाराष्ट्रातून नष्ट झालेला दिसेल, असे अग्रलेखातून म्हटले. 'तुमच्या छाताडावर बसून मुंबई जिंकूच', असा इशारा शिंदे गटाला दिला आहे.
शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदानात होणार आहे."आम्हीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार" असा दावा दोन्ही गटांनी केला आहे. दोन्ही गटांनी दसरा मेळाव्याचं पोस्टर जारी करीत एकमेकांवर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेने मेळाव्यास दीड लाख, तर शिंदे गटाने तीन लाख शिवसैनिक येतील असा दावा केला आहे.
शिंदे गटाने छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो पोस्टरवर आहेत. तसंच पोस्टरवर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह देखील आहे.
शिवसेना आमचीच, आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, हे अधोरेखीत करण्यासाठी शिंदे गटाच्या मेळाव्यात व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खूर्ची ठेवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. बाळासाहेबांची आठवण कायम राहावी, यासाठी त्या खूर्चीवर चाफ्याची फुले ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा झाला. शिवसेनेच्या या मेळाव्यासाठी व्यासपीठावर वेगळी खूर्ची ठेवण्यात आली होती. शिवसेना नेते अनंत गिते आणि भास्कर जाधव यांच्या मध्ये शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांची खूर्ची ठेवण्यात आली होती. संजय राऊत हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली आहे. या प्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.