NCP : राष्ट्रवादीला उशीरा सूचलेले शहाणपण ; सरस्वती देवी पूजनावरुन भाजपचा हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेत भुजबळ यांनी माफी मागून आपलं विधान मागे घ्यावं असं म्हटलं आहे.
Chandrashekhar Bawankule, chhagan bhujbal
Chandrashekhar Bawankule, chhagan bhujbalsarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांच्या एका वक्तव्यानंतर वादंग निर्माण झाला आहे.

छगन भुजबळ यांनी देवी सरस्वती यांच्या फोटोवरुन केलेल्या विधानाने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. त्याच्या या विधानावरुन विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी टि्वट करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान भुजबळ यांनी हिंदू देवींचा उल्लेख करत केलेल्या विधानावरुन आता भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेत भुजबळ यांनी माफी मागून आपलं विधान मागे घ्यावं असं म्हटलं आहे.

भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती आणि शारदेऐवजी महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत असं विधान केलं. यावरुनच भाजपाने हा हिंदू देवी-देवतांचा अपमान असल्याचा दावा करत भुजबळांना लक्ष्य केलं आहे. भूजबळ आपल्या मतावर ठाम आहेत.

Chandrashekhar Bawankule, chhagan bhujbal
Chhagan Bhujbal : भुजबळ हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीतील ओवैसी ; बावनकुळेंचा हल्लाबोल

बावनकुळे यांनी टि्वट करीत या वादावरुन राष्ट्रवादीला टोमणा हाणला आहे. त्यांनी एक पत्र टि्वट केलं आहे. भुजबळ यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयात सरस्वती पूजन करण्यात आले, राष्ट्रवादीने हे मनापासून केले की हिंदू समाजाकडून त्यांच्यावर टीका झाली, त्यामुळे त्यांना उशीरा सूचलेले हे शहाणपण आहे, असा सवाल बावनकुळे यांनी या पत्रातून केला आहे. जनतेचा दबाब वाढला म्हणून राष्ट्रवादीने सरस्वती देवींची पूजा केली की त्यांच्या मनात सरस्वतीचे स्थान आहे,हे पाहावे लागेल, असे बावनकुळे यांनी विचारले आहे.

भुजबळ नेमकं काय म्हणाले ?

“शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com