Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT Dasara Melava 2023: 'खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे'; ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

Shivaji Park Dasara Melava 2023: दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

Ganesh Thombare

Mumbai News: शिवसेनेचा (ठाकरे गट) दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थावर पार पडला. या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातू शिवसैनिक दाखल झाले होते. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले.

या मेळाव्यातून त्यांनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून फडणवीसांवरही नाव न घेता निशाणा साधला.

खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. सध्याचे सरकार हे जनरल डायरलचे सरकार आहे, जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, मग सरकार इतकं रानटी कसं वागू शकतं, असेही ठाकरे म्हणाले.

"57 वर्षे परंपरा अविरत सुरू ठेवलीय, यापुढेही सुरू ठेवणार आहोत. रावण शिवभक्त होता पण तरी त्याला मरावं लागलं, सीतेप्रमाणे आता शिवसेना पळवण्याचे काम सुरू आहे. हनुमानाने लंका जाळली, त्याप्रमाणे खोक्याची लंका या मशालींनी जाळून टाकणार आहोत, असा जोरदार घणाघात ठाकरेंनी शिंदेंवर केला.

राहुल नार्वेकरांना सुनावलं...

शिवसेना आमदारांच्या सुनावणीसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट आव्हानही दिलं. "तुम्ही अपात्रतेचा निर्णय केव्हाही लावा, पण आज हा लवाद सर्वोच्च न्यायालयाला जुमानत नसेल तर ही लोकशाही टिकणार आहे की नाही ?, निकाल नका लावू पण निवडणूक लावा, मग होऊन जाऊद्या. सर्वोच्च न्यायालय अपमान करतेय, तरी निर्लज्जपणे तारीख पे तारीख देताहेत, असा घणाघात ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT