Shiv Sena Dasara Melava : ठाकरेंकडून मुलगा, नातवाच्या उल्लेखामुळे मुख्यमंत्री शिंदे झाले होते संतप्त

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी गेल्यावर्षीच्या दसरा मेळ्याव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशी टीका केली होती.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : "बाप मुख्यमंत्री, कार्टं खासदार आणि नातू आता नगरसेवकपदार डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या...!", उद्धव ठाकरे यांनी गेल्यावर्षीच्या दसरा मेळ्याव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर शिंदे भावूक आणि संतप्तपही झाले होते. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

शिवसेनेत फूट पडल्यानंतरचा पहिला दसरा मेळावा गेल्यावर्षी झाला. उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवतीर्थावर तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा 'बीकेसी'वर झाला होता. उद्धव ठाकरे यांचे भाष अंतिम टप्प्यात असताना शिंदे भाषणासाठी उभे राहिले.

ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे शिंदे यांच्याकडे चिठ्ठीद्वारे पोहोचवले जात होते. ठाकरे यांनी नातवाचा उल्लेख केल्याची माहिती शिंदे यांना चिठ्ठीद्वारे देण्यात आली. ठाकरेंनी नातवाचा उल्लेख केल्याची माहिती मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा संताप अनावर झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
NCP Dhule News : महाराष्ट्रात राष्ट्रवादी फिजिकली अन् डिजिटलीही सक्षम होतेय

उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील भाषणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शेलकी टीका केली होती. बाप मुख्यमंत्री, कार्टं खासदार आणि नातू आता नगरसेवकपदार डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांनी मुलगा श्रीकांत आणि नातू रुद्रांश यांचा उल्लेख केल्याची चिठ्ठी एकनाथ शिंदेपंर्यंत पोहोचवण्यात आली. ती पाहून एकनाथ शिंदे यांचा संताप अनावर झाला होता.

माझा नातू दीड वर्षाचा आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचे अधःपतन सुरू झाले आहे. कुणावर टीका करत आहात ? दीड वर्षाच्या बाळावर...तुम्ही कोणत्या पातळीवर पोहोचला आहात ? तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तुम्ही मुख्यमंत्री झालात, तुमचा मुलगा मंत्री झाला. त्यावेळी आम्ही काहीही बोललो नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी होती.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना बाजूला ठेवून तुम्ही सत्ता प्राप्त केली. छातीवर दगड छेवून आम्ही तुमच्यासोबत राहिलो होतो. मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटायला हवी होती, अशा तिखट शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले होते.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Shivsena UBT Dasara Melava : उद्धव ठाकरे शिवतीर्थावर काय बोलणार? संजय राऊत यांनी दिले संकेत

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील बहुतांश मुद्दे नियोजित, लिखित होते. मात्र, मुलाचा आणि नातवाचा उल्लेख झाल्याचे कळल्यानंतर ते व्यथित झाले होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका टाळली होती. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांवर टीका झाल्यानंतर मात्र शिंदे संतप्त, व्यथित झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Edited by Ganesh Thombare

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
BJP Loksabha News : मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार गट गाफील, भाजप झाला सक्रिय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com