Eknath Shinde, Datta Dalvi Sarkarnama
मुंबई

Datta Dalvi News : आमच्यात शिवसेनेचे रक्त, समोरचे भ्याड; जामिनावर सुटताच दळवींचा बाण

Sachin Fulpagare

Uddhav Thackeray Shiv Sena News : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांना जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर दत्ता दळवी यांचे कुटुंबीयांनी आरती ओवाळत स्वागत केले. या वेळी दत्ता दळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवी यांना अटक झाली होती.

आपल्याला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी नोटीस द्यायला हवी होती. मी कुठलाही गुन्हा केलेला नव्हता. एका सभेत फक्त एक वक्तव्य केलं होतं. त्या शब्दाबद्दलही संजय राऊत यांनी आधीच सांगितलं आहे. या शब्दावर बंदी असेल तर धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील चित्रपटात तो शब्द आहे, मग तो का नाही काढला? आणि तसे काय मी त्यांना वावगी शिवी दिली नाही. मी त्या चित्रपटाचा संदर्भ देतच बोललो होतो, असे जामीन मिळाल्यानंतर दत्ता दळवी म्हणाले.

आपल्याला जाणूनबुजून अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप दत्ता दळवी यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषणात शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवी यांना तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्यांची आज जामिनावर सुटका करण्यात आली. आम्ही गद्दारांची अवलाद नाही. आमच्यात शिवसेनेचे रक्त आहे. कार फोडताना तिथे असतो तर दोघांना लोळवलं असतं , असे प्रत्युत्तर दळवी यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझं वय 71 आहे. पण माझी गाडी फोडली तेव्हा मी असतो तर दोघांना तरी लोळवलं असतं. मी तुरुंगात असताना ते कोणाला भेटले आणि कुठे बसले हे मला माहितीये. समोरचे भ्याड आहेत. आम्हाला ही काही नवी वेळ नाही. शिवसेनाप्रमुखांनी घडवलं आहे. शिवसैनिक सोबत होते. तुरुंगातही व्यवस्था केली. अटकेनंतर दोन वेळा उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. आता तुरुंगातून सुटल्यानंतर मातोश्रीवर जाणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी दत्ता दळवी यांच्याविरोधात भांडूप पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT