Datta Dalvi News : दत्ता दळवींची आजची रात्र तुरुंगातच जाणार ; उद्या जामिनावर सुनावणी

Datta Dalvi Controversial Statement Against CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी अपशब्द वापरल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
Datta Dalvi
Datta DalviSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या दळवींच्या गाडीची तोडफोड देखील करण्यात आली होती. ही तोडफोड शिंदे गटाकडून करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

यानंतर दोन्ही गटात वादाची ठिणगी पडली आहे. याचवेळी दळवींनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जाला भांडूप पोलिसांचा विरोध आहे. त्यामुळे आता दत्ता दळवींच्या जामीन अर्जावर उद्या ( शुक्रवारी ) 11 वाजता सुनावणी होणार आहे. 

Datta Dalvi
Telangana Exit Polls 2023 : तेलंगणात यंदा सत्ता परिवर्तन? 'KCR' यांची हॅटट्रिक हुकणार, काँग्रेस करणार पुनरागमन!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरल्याचा ठपका ठेवत दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. दळवींची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबईत भांडूपमध्ये 26 नोव्हेंबरला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दळवींचे समर्थन केले होते. त्यानंतर दळवी यांच्या गाडीची तोडफोड शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची घटना घडली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, आता आरोपीला जामिनावर मुक्त केले तर दोन्ही गटांमध्ये एकमेकांविषयी रोष निर्माण होईल. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना जामीन मंजूर केल्यास तपास कार्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच गुन्ह्यातील साक्षीदार यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे आता दळवी यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी 11 वाजता सुनावणी होणार आहे.

ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तोडफोडीवर ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आमदार सुनील राऊत म्हणाले, "हे काम शिंदे गटाचे आहे. त्यांच्यात समोर येण्याची धमक नसल्याने मागून असा भ्याड हल्ला केला आहे. या लोकांची ओळख पटली असून त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई केली नाहीत तर येत्या 24 तासात त्यांना जशास तसं उत्तर देऊ. गाडी फोडणाऱ्यांच्या घराच्या काचाही शिल्लक राहणार नाहीत असा इशारा आमदार राऊत यांनी दिला आहे.

(Edited By Sudesh Mitkar)

Datta Dalvi
Eknath Shinde During Modi Speech: पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी मुख्यमंत्री शिंदेंना लागली 'डुलकी'; व्हिडिओ व्हायरल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com