Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Thackerays Criticism Ajit Pawar: अजित पवारांना भाजपचे सरकार चालविण्याचे कंत्राट दिले...

Maharashtra Politics : ठेकेदारीत महाराष्ट्रानेही पाय ठेवला असल्याचा आरोप फडणवीसांवर केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या 'सामना'तून मोदी सरकार, शिंदे गट, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली, या भेटीवरूनही अग्रलेखात निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस जणांचा ‘मिंधे’ गट फोडून त्यांनाही कंत्राटी पद्धतीनेच राज्य चालवायला दिले आहे. राज्यात सर्वकाही कंत्राटी पद्धतीनेच चालवले जात आहे. शिंदे यांचे कंत्राट संपत आल्यानेच अजित पवार व त्यांच्या लोकांना राज्य चालवण्याचे कंत्राट दिले जाईल असे बोलले जात असल्याचे अग्रलेखात म्हटलं आहे.

ठेकेदारांचे ठेकेदार बनून कारभार..

"उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या आहेत, पण पैसा जातोय फुटीर आमदारांचे मन शांत करण्यासाठी. अनेक सरकारी आस्थापना, महामंडळे, संस्था अडचणीत असून, तेथील कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत. सगळेच जण हवालदिल आहेत, मग हे सरकार कोणासाठी चालले आहे? असा सवाल करीत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे आपापल्या गटाच्या लोकानांच ठेकेदारीचा मलिदा कसा मिळेल या विचाराने ठेकेदारांचे ठेकेदार बनून कारभार करीत असल्याचे टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी विद्यमान शिंदे-फडणीस-पवार सरकारवर सोडले आहे.

फडणवीसांना टोला

मोदी यांच्या सरकारने सैन्यात ‘ठेकेदारी’ पद्धतीने भरती सुरू केली आहे. त्यांनी सैन्य भरतीत ठेकेदारी आणली म्हणून महाराष्ट्रात पोलीस भरतीत ठेकेदारी आणावी हे योग्य नाही,’वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपाची नाही आहे, असा टोला अग्रलेखातून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरतीच्या संदर्भात फडणवीस घेतलेल्या निर्णयावर लगावला आहे.

ठेकेदारीत महाराष्ट्रानेही पाय ठेवला..

मुंबईसारख्या शहराची सुरक्षा व्यवस्था अशा बाह्य यंत्रणेवर सोपवावी हा त्यावरचा उपाय नाही, असेही ठाकरेंनी सरकारला ठणकावले आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत ठेकेदारी पद्धतीने राज्यकारभार चालवला जात आहे. देशात व्यापारी वृत्तीचे सरकार आल्यापासून अशा राजकीय ठेकेदारीचा अनुभव येत आहे. त्या ठेकेदारीत महाराष्ट्रानेही पाय ठेवला असल्याचा आरोप फडणवीसांवर केला आहे.

मंत्रालय, पालिका, सरकारी आस्थापनांत ते कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक पुरवतात व स्वतः मालामाल होतात.आता हे दहा हजार पोलीस भरतीचे कंत्राट पुरवण्याचे काम अशाच भाजप कंत्राटदारांना मिळणार आहे काय? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT