यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, अशी सूचना त्यांनी दिल्या. पुणे, मुंबई, पंढरपूर येथे भेसळयुक्त पनीर विक्रीचे अनेक प्रकार आढळल्याने सरकारने यावर कडक कारवाई करण्याचे पावलं उचलले आहेत. ‘ॲनालॉग चीज’ हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी ‘ॲनालॉग पनीर’ या नावाने विक्री होत असल्याची तक्रारी सदस्यांनी केल्या. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील एक प्रकरण उघडकीस आले.
त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार बोलत होते. बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, सुधीर मुनगंटीवार, विक्रम पाचपुते विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पनीरपासून बनवण्यात आलेल्या विविध डिसेच अनेक जण आवडीनं खातात. मात्र या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून बनावट पनीर बनवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याच बनावट पनीरच्या मुद्दाकडे भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधिमंडळ अर्थंसंकल्पात सगळ्याचं लक्ष वेधलं होतं. पाचपुते हे चक्क बनावट पनीर घेऊनच सभागृहात आले होते.
सध्या विक्री होत असलेल्या पनीरपैकी 60 ते 70 टक्के पनीर बनावट असल्याची माहिती आहे. विक्रमसिंह पाचपूते यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत सरकारनं बनावट पनीर रोखण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भेसळयुक्त खाद्यपदार्थ निर्मिती, तसेच विक्रीचे प्रकार आढळून आल्यास त्वरीत अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन सहआयुक्त डाॅ. राहुल खाडे यांनी केले आहे.
काही दिवसापूर्वी पुण्यात भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा प्रकार अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) आणि पोलिसांनी उघडकीस आणला होता. १४०० किलो पनीर, भेसळ करण्यासाटी वापरली जाणारी १८०० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा ११ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला होता. पोलिसांच्या पथकाने मांजरीतील एका भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या उत्पादकाच्या कारखान्यात कारवाई केली होती
दुधातील भेसळ तपासण्यासाठी तातडीने प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करा
पनीरमध्ये ‘ॲनालॉग चीज’ असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावा.
दूध भेसळीसंदर्भात जनजागृती करण्यात यावी,
जनतेला तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक योग्य प्रकारे कार्यान्वित करावा,
पोर्टल विकसित करावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.