Maharashtra Political News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्या स्नेहल जगताप या भाजपच्या वाटेवर असल्याची बातम्या अनेक दिवस माध्यमात येत होता, पण स्नेहल जगताप यांनी या बातम्या खोट्या ठरवत सर्वांना धक्का दिला आहे त्या भाजपमध्ये नव्हे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांनी अखेर शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, त्याची तयारी झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून महाड विधानसभेची निवडणुक त्यांनी लढवली होती. महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांच्या त्या कन्या आहेत.
स्नेहल जगताप उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीतील भाजप अथवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून कोकणाच्या राजकारणात जोरात रंगली होती. या चर्चांना आज पूर्णविराम मिळणार आहे.
शिवसेनेचे भरत गोगावले यांच्याविरोधात स्नेहल जगताप यांनी निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. महाड विधानसभा मतदारसंघात गोगावले यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीकडून जगताप यांचा पक्षप्रवेश केला जात असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस गेले होते. ते महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांच्याच उपस्थितीत स्नेहल जगताप यांचा भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा होती. त्यामुळे जगताप यांचे राजकीय वजन किती आहे, हे लक्षात येते.
जगताप यांनी महाड विधानसभा मतदारसंघातून मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. स्नेहल जगताप ठाकरेंचे शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवपासून होती.स्नेहल जगताप यांनी काँग्रेस सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. महाडमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचे राजकीय वजन असल्याने भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्यांनी त्या आपल्या पक्षात येतील, यासाठी प्रयत्नशील होते.
भरतशेठ गोगावलेंच्या त्या कट्टर विरोधक आहेत. स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी प्रवेशाने दोन्ही शिवसेनेला झटका बसला आहे. महाडमध्ये गोगावलेंविरोधात अजित पवार यांना तगडा चेहरा मिळाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आता महाडमध्ये आपली राजकीय ताकद वाढवता येईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.