Gunratna Sadavarte, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : सदावर्ते कुणाचा माणूस? हे सर्वांना ठाऊक; फडणवीसांचा रोख कुणाकडे?

Mangesh Mahale

Mumbai : मराठा आरक्षणाला विरोध करणारे अँड गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. त्याला फडणवीसांनी उत्तर दिले. "सदावर्ते यांच्याशी माझा काहीही संबध नाही, तो कुणाच माणूस आहे, हे सर्वांना ठाऊक," असे फडणवीस म्हणाले.

राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाला व मनोज जरांगे पाटलांवर गंभीर टीका करणाऱ्या सदावर्तेंच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पोलिसांसमोर त्यांच्या दोन गाड्या आंदोलकांनी फोडल्या. सदावर्ते हा फडणवीसांना माणूस असल्याची टीका केली जात आहे. त्यावर फडणवीसांनी एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सदावर्ते यांच्याशी काहीही संबध नाही..

"कुठल्याही हिसेंचं समर्थन केले जाणार नाही. पण सदावर्ते यांनी सुध्दा ही गोष्ट लक्षात ठेवायची हवी की एखाद्या समजाच्या विरोधात किती बोलावं," असा सवाल फडणवीसांनी केला. " सदावर्ते यांची भूमिका सातत्याने बदलत असते. व्यक्तिगत जीवनात मी त्यांना फक्त दोनदा भेटलो. माझा सदावर्ते यांच्याशी काहीही संबध नाही, तो कुणाच माणूस आहे, हे सर्वांना ठाऊक आहे," असे सांगत फडणवीसांचा रोख कुणाकडे आहे, याची चर्चा सध्या सुरु आहे.

सदावर्तेंनी माझ्यावर आरोप केले..

"मी मुख्यमंत्री असताना २७ जून २०१९ ला मराठा आरक्षण दिले होते. ते वैध ठरविण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यावेळी सदावर्तेंनी माझ्यावर आरोप केले की फडणवीस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे.त्यांनी न्यायालयावर दबाब टाकला की माझी सीबीआय चौकशी करावी, तेव्हा त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावरही टीका केली होती, " असे फडणवीस म्हणाले.

म्हणून अजित पवार आमच्यासोबत आले..

याच मुलाखतीत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत भाष्य केले. ते आमच्याबरोबर का आले, याविषयी त्यांनी सांगितले. ते म्हणाले, "आमचं सरकार स्थिर होतंच परंतू राजकारणात शक्ती वाढवावी लागते. अजित पवार आमच्यासोबत पूर्ण ताकदीने आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला आमच्यासोबत घेतले. ते 2019 ला ही येणार होते. अजितदादांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता. तो आम्ही पाळला,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT