Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीही मुख्यमंत्री राहतील; फडणवीसांनी सांगितलं कारण..

MLA Disqualification Hearing : आम्ही कायद्याने सर्वकाही केले आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही," असे फडणवीस म्हणाले.
MLA Disqualification Hearing
MLA Disqualification Hearing Sarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis On CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह सोळा आमदार अपात्रतेबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच देणार आहेत. सोळा आमदारांना अध्यक्षांनी अपात्र ठरवलं तर मुख्यमंत्री कोण होणार, अजित पवार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ पडणार का? अशा चर्चांना उधाण आले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा प्लॅन बी सांगितला आहे. एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील, असे फडणवीसांनी सांगितले.

"नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं (MLA disqualification decision) तरीही तेच मुख्यमंत्री राहतील, शिंदेंना विधानपरिषदेवर घेऊन त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिल," असे ठामपणे फडणवीस म्हणाले. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते. "एकनाथ शिंदे अपात्र होणारच नाहीत. आणि जर तसे झाले तरीही ते विधान परिषदेवर येऊ शकतात. पण आम्ही कायद्याने सर्वकाही केले आहे. आम्हाला कोणतीही भीती नाही," असे फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Disqualification Hearing
Eknath Shinde : मराठा आरक्षण देणारच; मुख्यमंत्र्यांची ग्वाही; जरांगेंची सरकारला काळजी...

"एकनाथ शिंदेंसह सोळा आमदार अपात्र ठरतील, हे सरकार पूर्णवेळ चालणार नाही, असे सांगून उद्धव ठाकरे आपल्याकडील उरलेल्या आमदारांना आशा दाखवत आहेत. शिंदे अपात्र ठरल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, असा कुठलाही बी प्लॅन नाही. तेच मुख्यमंत्री राहतील," असे फडणवीसांनी सांगितले.

दरम्यान, आमदार अपात्रतेबाबत सल्ला घेण्यासाठी विधानसभा राहुल नार्वेकर हे महाधिवक्ता तुषार मेहता यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

या भेटीबाबत नार्वेकर म्हणाले, "हा माझा पूर्व नियोजित दौरा आहे.राष्ट्रवादीच्या आठ आमदाराना नोटीस ही अपात्रते बाबतची प्रक्रिया आहे. याबाबत छाननी झालेली आहे. त्यानुसार नोटीसा दिलेल्या आहेत. वेळापत्रक बदलाबाबत जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे. तो मी घेईन आणि लवकरच निर्णय देईन,"

MLA Disqualification Hearing
Pandharpur Kartiki Ekadashi : कार्तिकी पूजेचा मान उपमुख्यमंत्री फडणवीस, की अजितदादांना ? मंदिर समितीचा 'हा' निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com