CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

ठाकरे सरकारकडून कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : राज्य व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट मिळालं आहे. मोदी व ठाकरे सरकारने (Thackeray Government) सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता (DA Hike) मिळणार आहे. याचा फायदा निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.

राज्य सरकारच्या (Maharashtra Government) 17 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना (Government Employees) या वाढीचा फायदा होणार आहे. सरकारकडून याबाबतचा शासन निर्णयही काढण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासन आदेशानुसार, ता. 1 जुलै 2021 पासून सातव्या वेदन आयोगानुसार सुधारीत वेतनसंरचनेतील मूळ वेतनातील महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरून 31 टक्के करण्यात आला आहे. ही महागाई भत्ता वाढ ता. 1 जुलै 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च 2022 च्या वेतनासोबत रोखीने दिली जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट कऱण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याने केंद्राच्या पावलावर पाऊल टाकत काही तासांत हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर महागाई भत्ता ३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जाहीर केलेली भाडेवाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत (DR) चा अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा फायदा सुमारे 47.68 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना (Pensioners) होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या (7th pay commission) शिफारशींनुसार, महागाई भत्ता आणि महागाई रिलीफ वर्षातून दोनदा वाढवली जाते. कोरोना महामारीमुळे सरकारने 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत भत्यातील वाढ थांबवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT