अखेर शिवसेनेनं गीतेंचा मान राखलाच; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात दाखवून दिलं...

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते वेगळ्याच कारणानं चर्चेत आले आहेत.
Anant Geete
Anant GeeteSarkarnama
Published on
Updated on

रायगड : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कोकण दौऱ्यात शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) वेगळ्याच कारणानं चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केल्यानं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नाराजी ओढवून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात त्यांचे फोटो फलकांवरून वगळल्यानं कोकणात चर्चेला उधाण आलं होतं. पण आता शिवसेनेतूनच (Shiv Sena) या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी माणगाव येथे रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं असून मागील बाजूला मोठा फलकही लावला आहे. या फलकावर गीतेंना स्थान देण्यात आलं आहे. मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या फोटोनंतर गीतेंचा फोटो लावण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचा फोटो आहे.

Anant Geete
निलंबित IPS त्रिपाठींचा पाय खोलात; ठाकरे सरकारपाठोपाठ न्यायालयाचाही दणका

या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने गीतेंचा फोटो लागणार की नाही, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेऱ शिवसेनेकडून गीतेंना मान देण्यात आला असून त्यांचा फोटो फलकावर लागल्याने नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पण असं असलं तरी ठाकरेंच्या दौऱ्यात ठिकठाकणी लागलेल्या कार्य़क्रमाच्या व स्वागताच्या फलकांवरून गीतेंना डावलण्यात आलं आहे.

गीते हे रायगडचे दोन वेळा आणि रत्नागिरी जिल्ह्याचे चार वेळा खासदार राहिलेले आहेत. पण त्यांना आदित्य यांच्या दौऱ्यात फारसे महत्व दिले गेले नसल्याचे सध्याचे चित्र आहे. अनंत गीते हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे याच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले. यामुळे गीते हे पक्षनेतृत्वावर नाराज होते. माणगाव मेळाव्यातही गीते यांनी आपला संताप व्यक्त केला होता.

Anant Geete
इंधन शंभरीनंतर आता दरांची डबल सेंच्युरी पार करणार? राष्ट्रवादीला भीती

शरद पवारांवर केली होती टीका

शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. पवार यांना कोणी जाणता राजा म्हणो किंवा आणखी काही म्हणो पण आमचे नेते ते होऊच शकत नाही. ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. ज्या दिवशी तुटेल त्यादिवशी तटकरेंच्या घरी जाणार आहात का. आपल्याच घरी, शिवसेनेच्या घरी येणार आहात ना, अशी टीका गीते यांनी केली होती. त्याबाबत गीते यांना शिवसेना नेतृत्वाकडून समज देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर झालेल्या दसऱ्या मेळाव्यालाही ते व्यासपीठावर उपस्थित नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com