Ministry
Ministry Sarkarnama
मुंबई

Self Harm in Front of Ministry : मंत्रालयासमोर कीटकनाशक प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

सरकारनामा ब्युरोे

Mumbai Crime News : आपली जागा हडप केल्याचा आरोप करीत धुळ्यातील ४६ वर्षीय महिला न्यायासाठी मुंबईतील मंत्रालयात आली होती. तिने मंत्रालयासमोर कीटकनाशक प्राशन केले. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. शितल गादेकर असे या महिलेचे नाव आहे.

पीडित महिलेची धुळ्यातील नऊ गुंठे जागा आहे. ती जागा एका व्यक्तीने हडप केली होती. या विरोधात ती सरकार दरबारी न्याय मागण्यास आली होती. तेथे नैराशेतून महिलेने कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित महिलेला उपचारासाठी तात्काळ जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस (Marin Drive Police) अधिक तपास करत आहेत. पोलीस तपासात पीडित महिला ही मंत्रालयात जवळ येण्यापूर्वीच कीटकनाशक औषध घेऊन आली असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार, धुळे एमआयडीसी परिसरात शीतल गादेकर यांच्या पतीच्या नावे एक प्लॉट आहे. तो एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संगनमत करुन नरेश कुमार मानकचंद मुनोत व्यक्तीच्या नावे केला आहे. त्यासाठी बोगस खोटी नोटरी बनविल्याचा त्यांचा आरोप होता.

तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी विनाकायदेशीर खरेदी खत ऐवजी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बोगस सह्या केल्या. तसेच छायाचित्रासाठी त्यांच्या पतीच्या जागी बोगस व्यक्तीला दाखविल्याचाही शितल गादेकर यांचा आरोप होता.

या प्रकरणी त्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रा केली होती. दरम्यान २०२० पासून या प्रकरणाचा पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने नैराश्यातून शितल गादेकर यांनी मंत्रालयासमोर विष प्रशान करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान शितर गादेकर यांचा मृत्यू झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT