Mantralay Self Harm News: मंत्रालयासमोर एकाच दिवसात तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू

पीडित महिला ही मंत्रालयात जवळ येण्यापूर्वीच कीटकनाशक औषध घेऊन आली असल्याचे तपासात समोर आले आहे
Mantralay
Mantralay Sarkarnama
Published on
Updated on

Mantralay Latest news Update: मंत्रालयासमोर सोमवारी (२७ मार्च) दिवसभरात तीन आत्महत्येच्या घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. यातील एका घटनेमध्ये 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची धुळ्यात नऊ गुंठे जागा एका व्यक्तीने बळकावली आहे. या विरोधात ती सरकार दरबारी न्याय मागण्यास आली होती. पण प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने संबंधित महिलेने मंत्रालयाच्या आारातच कीटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Mantralay
Self Harm in Front of Ministry : मंत्रालयासमोर कीटकनाशक प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

या घटनेनंतर पीडित महिलेला उपचारासाठी तात्काळ जे जे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. शितल गादेकर असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत. पीडित महिला ही मंत्रालयात जवळ येण्यापूर्वीच कीटकनाशक औषध घेऊन आली असल्याचे तपासात समोर आले आहे

तर दुसऱ्या घटनेत संगीता डवरे या महिलेचे पती नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असून त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात जखमी महिलेच्या पतीवर रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार न केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, याबाबत तक्रार नोंदवली होती. संबंधित डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा कारणाने तिने काल येऊन मंत्रालय समोर आत्महत्येचा प्रयत्न केला. संगीता यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Mantralay
Jayant Patil News : ही लढाई एकतर्फी नाही : निवडणुकीबाबत जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा

तर तिसऱ्या घटनेत पुण्याच्या मावळ तालुक्यातील रमेश मोहिते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. अपंगांना अनुदानात वाढ करून देण्यात यावी. यासाठी रमेश मोहिते अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच मंदिरा पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com