Abu Azami 
मुंबई

Abu Azami : अबु आझमी यांना जीवे मारण्याची धमकी; वाचा, काय आहे प्रकरण?

मुघल शासक औरंगजेबाबाबत सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

Abu Azami News: समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अबू आझमी यांच्या खासगी सचिवाला धमकीचा कॉल आला होता. औरंगजेबाबाबत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत फोन करणाऱ्याने आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

आझमी यांनी नुकतेच औरंगजेबाच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर या प्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

मुघल शासक औरंगजेबाबाबत सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. त्यातच अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांना ही धमकी मिळाली आहे. काही दिवसांपुर्वी सोशल मिडीयावर डान्सचा एक व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाला होता, ज्यामध्ये काही लोक मुघल शासक औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होते.

त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आंदोलनही करण्यात आले. पोलिसांनी नाचणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल केला. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे १४ जानेवारीच्या रात्री दादा हयात कलंदर साहेबांची चंदन मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हापासून औरंगजेबाबद्दल राजकीय नेत्यांकडून सातत्याने वक्तव्ये केली जात आहेत.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आयकर विभागाने अबू आझमी यांचे निकटवर्तीय आभा गणेश गुप्ता यांच्या घरावर छापा टाकला होता. बेनामी संपत्ती आणि काळ्या पैशाशी संबंधित आरोपांवरून हा छापा टाकण्यात आला होता. मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊमध्ये ३० हून अधिक ठिकाणी आयटीने हे छापे टाकल्यात आले होते.

अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. तर आभा गुप्ता या अबू आझमी यांच्या जवळच्या आणि सपाचे सरचिटणीस गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत. गणेश गुप्ता यांचे निधन झाले आहे. आभा गुप्ता यांच्या कंपन्यांशी संबंधित ठिकाणांवरही हे छापे टाकण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT