Pune MNS News: धक्कादायक! कुटुंबीयांसमोरच मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षावर गोळीबार

मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. अशी धमकीही गुंडांनी समीर थिगळे यांना दिली होती.
Pune MNS News
Pune MNS News
Published on
Updated on

पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर एकाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर गुंडांनी गोळ्या झाडल्या. धक्कादायक म्हणजे त्यांच्या कुटुंबियांसमोरच हा सर्व प्रकार घडल्याने त्यांचे कुटुंबियांमध्येही परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी राजगुरुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातर हल्ला करणे आणि खंडणी मागणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार असून राजगुरू नगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचीही माहिती आहे.

Pune MNS News
Kolhapur News : ज्योतिरादित्य शिंदेंचा कोल्हापूरी पाहुणचार; भरलं वांग,झणझणीत ठेच्यावर ताव

मिळालेल्या माहितीनुसार, समीर थिगळे आपल्या घरी असताना तेथे काही गुंड आले. या गुंडांपैकी एकाने ''मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुला माज आलाय का, आता संपवतोच तुला,'' अशी धमकी देत समीर यांच्यावर पिस्तुल रोखलं. त्याचवेळी गुंडांनी थिगळे यांच्याकडे पैशाचीही मागणी केली.

इतकेच नव्हे तर गुंडांने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने पिस्तुलातून गोळी सुटली नाही. यानंतर गुंडाने पुन्हा हवेत गोळबार करत थिगळे यांना धमकावून तिथून पळ काढला. दैव बलवत्तर म्हणून थिगळे यांचा जीव वाचला. कुणालाही इजा झाली नाही. पण हा सर्व प्रकार त्यांच्या कुटुंबियांसमोरच घडल्याने त्यांचे कुटुंबीय हादरुन गेले आहेत.

समीर थिगळे हे मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या वर्षी त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड केली होती. एप्रिल २०२१ मध्येच त्यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं होतं. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com