Vijaya Pote, Bal Hardas Sarkarnama
मुंबई

Shiv Sena News: कल्याण सोडून जा, नाहीतर संपवून टाकेन; ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला धमकी

Thackeray group News: दोन दिवसातून राजकारण सोडून संन्यास घ्यायचा, कल्याण सोडून निघून जायचे, नाहीतर संपवून टाकेन," अशी धमकी ठाकरे गटातील ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी दिली असे विजया पोटे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Mangesh Mahale

Kalyan News: काही दिवसापूर्वी ठाकरे गटातील कल्याण जिल्ह्या संघटक विजया पोटे आणि त्यांचे पती, माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पोटे दांपत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी विजया पोटे (Vijaya Pote) यांनी डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

"दोन दिवसातून राजकारण सोडून संन्यास घ्यायचा, कल्याण सोडून निघून जायचे, नाहीतर संपवून टाकेन," अशी धमकी ठाकरे गटातील (Thackeray group) ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी दिली असे विजया पोटे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. बाळ हरदास (Bal Hardas) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोटे यांनी केलेले आरोप चुकीचे, खोटे आहेत, मी कुणालाही धमकी दिली नाही. धमकी देण्याचा काम त्यांचे आहे, असे स्पष्टीकरण बाळ हरदास यांनी दिले आहे. मानपाडा पोलिस तपास करीत असून बाळ हरदास यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही दिवसापूर्वी विजया पोटे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकासकामांचे कौतुक करीत शिवसेनेत (Shiv Sena ) प्रवेश केला होता. त्यांच्यासमवेत उपशहर संघटक पल्लवी बांदिवडेकर, मंदाकिनी गरुड, मोनिका इंगळे, वंदना पाटील, रंजना पाटील, भारती भोसले, नमिता साहू आदींनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT