Nagar Lok Sabha 2024: अजितदादा, सुप्रियाताई, पंकजाताई, आठवलेंच्या निशाण्यावर कोण ? नगरमध्ये सभांचा धडाका

Lok Sabha Constituency 2024: एकेकाळी अजितदादांचे निकटवर्तीय असलेले आमदार नीलेश लंके यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खासदारकी लढवत आहे. लंकेच्या बालेकिल्ल्यात अजितदादा काय बोलणार याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले आहे.
Nagar Lok Sabha 2024
Nagar Lok Sabha 2024Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यासाठी सोमवारी राज्यात अकरा लोकसभांसाठी (Maharashtra Lok Sabha Constituency 2024) मतदान होत आहे. प्रचारासाठी दोन दिवस उरले असताना उमेदवार पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरत आहेत. बड्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. आज अहमदनगर (Nagar Lok Sabha 2024) जिल्ह्यात शेवटच्या टप्यात आठ सभांमधून नेते मतदारांना आवाहन करणार आहेत.

नगर दक्षिणमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघात दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांची तोफ धडाडणार आहे.

एकेकाळी अजितदादांचे निकटवर्तीय असलेले आमदार नीलेश लंके यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खासदारकी लढवत आहे. लंकेंनी अजितदादांची साथ सोडल्यानंतर लंकेच्या बालेकिल्ल्यात अजितदादा काय बोलणार याकडे पारनेरकरांचे लक्ष लागले आहे.

Nagar Lok Sabha 2024
Kolhapur Politics: विधानसभेच्या इच्छुकांचे महायुतीला टेन्शन; 4 जूनलाच कळणार कोणी कोणाचा केला गेम

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पारनेरच्या तालुक्यातील ढवळीपुरी येथे खासदार सुप्रिया सुळे यांची सभा होत आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची पाथर्डी येथे दुपारी सभा होत आहे. भास्कर जाधव यांच्या उपस्थित जामखेड येथे सभा होणार आहे.

सायंकाळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले अहमदनगर शहरात विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यात सभांचा धडाका होणार असून शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे आणि इतर ठिकाणी निवडणुका झाल्यामुळे अनेक नेते आता जिल्ह्यात येणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात येत आहेत. कर्जत येथे सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे. राष्ट्रवादी फुटण्यापूर्वी काही दिवसापूर्वी कर्जत शहरात अजित पवार यांनी रोहित पवारांच्या कामाची स्तुती केली होती.

आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय गणिते बदलली आहेत. त्यानंतर अजितदादांनी ही पहिलीच सभा होत आहे. आपले पुतणे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात अजित पवार काय भाषण करणार याकडे नगर जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com