Nana Patole
Nana Patole Sarkarnama
मुंबई

'ओला दुष्काळ' जाहीर करा, नाहीतर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : नाना कडाडले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अतिवृष्टीच्या संकटामुळे शेतकऱ्यांवर दयनीय परिस्थिती ओढावली आहे. शेतमालाचे मोठे नुकसान झाले. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली. शिंदे-फडणवीस सरकारकडून जाहीर झालेली मदतीपैकी अजूनही एक पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे होण्यातही प्रशासनाची उदीसीनता दिसून येते. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर राज्यभर तीव्र आंदोलन होईल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला.

यावर्षी शेतकऱ्यांवर निसर्गाने संकट ओढवले आहे. विदर्भ, मराठावड्या आणि इतर भागातह अतिवृष्टी झाली, त्यात शेतकऱ्यांनी दिससरात्र राबून पिकविलेले उभे पीक वाया गेले. सोयाबीन, कपाशी, तुर, मका, बाजारी इत्यादी पिकांचं अतोनात नुकसान झाले आहे्. फळबागा व पालेभाज्या याचेही मोठ्या प्रमाणावर या पावसाचा नुकसान झाले आहे. जोडधंदा असणाऱ्या पशुधनालाही याचा फटका बसला आहे.

सरकारने पंचनाम्याचे आदेश आहेत परंतु स्थानिक पातळीवर प्रशासन ढिम्मं आहे. विदर्भ व मराठवाड्यातील या संकटाचा सामना करणाऱ्या शेततऱ्यांना मी स्वत: भेट घेतली. नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. अधिकारी पंचनामे करण्यासाठी उपस्थित नाहीत, पंचानामे वस्तुस्थिती पाहून केली जात नाही. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. राज्य सरकारने मोठ्या आवेशात जास्त मदत दिल्याचे सांगितले, पण या मदतपैकी काहीच पोहचले नाही.

अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचे नुकसान पाहून सरकारने शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक होते, पण मदत मिळाली नाही. महाविकास आघाडी सरकार असताना अशा स्थितीततात्काळ शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची रोख रक्काम मदत म्हणून दिली. यासाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेऊन, खात्यातपैसे जमा केले.

अटी, शर्थी, नियमांचा बाऊ करून, अडथळे निर्माण करुन शेतकऱ्याला ऑनलाईनच्या रांगेत उभे केले नाही. शेतकरी हा अन्नदाता सरकारचा प्राधान्याचा विषय असला पाहिजे.पण भाजप सरकार हे शेतकरीविरोधी आहे, म्हणूनच त्यांनी हात आखडता घेतला, असे पटोले म्हणाले. काँग्रेस पक्षानेच पहिल्यांदा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. राज्यातील ईडी सरकारने शेती आणि शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांची उरली सुरली स्वप्नेही धुळीस मिळवली. पण सरकारला सत्तासंघर्षाच्या भांडणातूनच सवड मिळत नाही. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतक-यांना मदत दिलीनाही, तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असेही म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT