दिल्ली : शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र आता ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या चिन्हावर वाद निर्माण झाले आहे. समता पार्टीने यावर आक्षेप घेतले आहे. मशाल चिन्हासाठी समता पार्टीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केले आहे. समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी यावर प्रतिक्रीया दिली.
"निवडणूक आयोगाने यापूर्वीच आम्हाला मशाल चिन्ह बहाल केले होते. हे चिन्ह आम्हाला पुन्हा मिळावे यासाठी आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात याचीका दाखल केली आहे. मशाल हे चिन्ह आमचं आहे, समता पार्टीचं आहे," असे उदय मंडल यांनी दावा केला आहे.
आमचा पक्ष बंद झालेला नाही, आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहोत. सातत्याने निवडणुकीत भाग घेत आहोत. आगामी बिहार निवडणुकीसाठी आम्ही तयारी करत आहोत. जर आमचं चिन्हच शिवसेनेकडे गेलं तर, आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार? असा सवालही मंडल यांनी उपस्थित केला.
येत्या सोमवारी किंवा मंगळवारी आमच्या याचिकेवर याबाबत सुनावणी होईल, त्यावेळी सर्व काही स्पष्ट होईल. यापुढची भूमिका तेव्हाच आम्ही स्पष्ट करू, असे मंडल यांनी म्हंटले.
दरम्यान, १९९६ पासून हे चिन्ह आपल्याडे असल्याचे समता पार्टीने दावा केला आहे. तर दुसरीकडे अंधेरीपूर्व निवडणूकीत आपला उमेदवार देण्याची घोषणाही समता पार्टीने केलेला आहे. "२००४ साली समता पार्टीची राज्यपक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे," असे समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्रुनेश देवळेकर यांनी यापूर्वीच सांगितले होते. या प्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून मशाल चिन्हावर दावा त्याxनी केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.