Deepak Kesarkar On Ajit Pawar :  Sarkarnama
मुंबई

Deepak Kesarkar On Ajit Pawar: अजितदादांनी आमच्या सरकारमध्ये यावं; मंत्री केसरकरांची दादांना खुली ऑफर!

सरकारनामा ब्यूरो

Shirdi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक राज्यातील मंत्री व शिवसेनेचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

'अजित पवारांनी सरकारमध्ये यावं, अशी आमची अपेक्षा आहे. अजित पवार हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा राज्यातील जनतेला व्हावा, यासाठीच त्यांनी आमच्या पक्षात यावं,' असे केसरकर यांनी म्हंटलं आहे. (Latest Marathi News)

दीपक केसरकर म्हणाले, "अजितदादांबद्दल अतिशय आदर आहे. परंतु दादा हे विरोधीपक्षाचे नेते आहेत. जबाबदार नेते आहेत. सामाजिक ऐक्य राखण्यामध्येसुद्धा अजितदादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील, याची मला खात्री आहे. आमची अपेक्षाच अशी आहे की, दादांनीसु्द्धा आमच्या सरकारमध्ये यावं. दादा कार्यक्षम ते मंत्री राहिले आहेत. आमच्यासोबत आले तर आम्हाला आनंदच होईल."

दीपक केसरकर हे शिर्डीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधला. एकनाथ शिंदेंच्या नुकत्याच जाहिरातीवरून उफाळून आलेला वाद यावरही केसरकर बोलले. या जाहीरातींचे पैसे धनादेशच्या माध्यमातूम देण्यात आले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावरही त्यांनी टीका केली.स्वत:च्या मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हणणे म्हणजे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT