Chitra Wagh On Sanjay Raut: वाह रे नौटंकीबाज ! चित्रा वाघ संजय राऊतांना असं का म्हणाल्या ?

Sanjay Raut Threaten Case: कार्यकर्त्याकडून धमकीचा बनाव रचल्याचा राऊतांवर आरोप
Sanjay Raut, Chitra Wagh
Sanjay Raut, Chitra WaghSarkarnama
Published on
Updated on

Chitra Wagh On Sanjay Raut Threaten : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणाची तपास सुरु आहे. दरम्यान, सुनील राऊत यांनीच धमकीचा बनाव रचल्याचे समोर आल्याची माहिती आहे. या प्रकरणी मयूर शिंदे याला अटक करण्यात आली आहे.

राऊत बंधुंना धमकी दिल्यानंतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले. यात मयूर शिंदे यांचे नाव समोर आले आहे. मयूर शिंदे हा सुनील राऊत यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. सुनील राऊत यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ व्हावी, यासाठी सुनील राऊत यांनी हा बनाव केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut, Chitra Wagh
Mla Kailas Patil On DCM Tour : दौऱ्यापुर्वी ठाकरे गटाच्या आमदाराचे फडणवीसांना अकरा प्रश्न..

राऊत धमकी बनाव प्रकरणावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. प्रसिद्धी मिळण्यासाठी संजय राऊत यांनी नैटंकी केल्याचा घणाघात वाघ यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

त्या म्हणाल्या. "वाह रे नौटंकीबाज ! जीवे ठार मारण्याचा फोन आल्याचे मोठे भांडवल सर्वज्ञानी संजय राऊतांनी (Sanjay Raut) केले. धमकी देणारा कोण निघाला तर त्यांचाच निष्ठावंत कार्यकर्ता. याचा अर्थ काय? आपल्याच कार्यकर्त्याला धमकी द्यायला सांगून केविलवाणी प्रसिद्ध मिळवायची आणि सरकारला बदनाम करायचे. हा त्यांचा रडीचा डाव आहे."

संजय राऊत यांना गेल्या गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जीवे मारण्याची धमकी आली. सुनील राऊत (Sunil Raut) यांच्या फोनवरुन ही धमकी देण्यात आली. फोन करणारा व्यक्ती हिंदीतून बोलत असल्याचे सांगण्यात आले. या धमकीनंतर संजय राऊत यांनी राज्य सरकारवरच गंभीर आरोप केले होते.

राऊत म्हणाले होते की, "मला आलेली धमकी सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे." त्यावर संजय राऊत आणि सुनील राऊतांना आलेल्या धमकीची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली. राज्यातील कोणत्याही पक्षाचा नेता असुरक्षित असणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने (State Government) दिली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com