uddhav thackeray, deepali sayed, eknath shinde  sarkarnama
मुंबई

ठाकरे-शिंदेंची 'श्रीराम-लक्ष्मणा'ची जोडी हिंदुत्त्वाच्या वनवासात कायम राहिल !

"शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे"

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) त्यांच्यावर टीका होत आहे. या गदारोळात शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी टि्वट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि एकनाथ शिंदे यांचा उल्लेख "राम-लक्ष्मण यांची जोडी" असे सांगत एकनाथ शिंदे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे.

दिपाली सय्यद यांनी टि्वट करीत "शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे," असा निर्धार करीत शिवसैनिकांना सल्ला दिला आहे. त्या आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्त्वाच्या वनवासात कायम राहिल. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहिल. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल,"

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करत एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची जोडी राम-लक्ष्मणाची असल्याची दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. (Deepali Sayed tweet about Eknath Shinde and Uddhav Thackeray)

दिपाली सय्यद म्हणाल्या की, माननीय उद्धव साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची श्रीराम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्त्वाच्या वनवासात कायम राहिल. शिवसैनिकांनो रडायचे नाही लढायचे. आपले मत शिवसेनेला कायम राहिल. हा रामराज्याचा संघर्ष महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. ठाकरे सरकार (Thackeray government) बरखास्त होणार का, शिवसेना कुणाची असणार, याबाबत सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. याबाबत राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट यांनी (Ulhat Bapat) विश्लेषण केलं आहे.

"एकनाथ शिंदे ३७ आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत, त्यांच्याकडे जर दोन तृतीयांश संख्याबळ झाले तर त्यांच्यावर पक्षांतर कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्यांनी जर ३७ आमदारांना राज्यपालांसमोर उभे केले आणि भाजपचे सदस्यांचा पाठिंबा घेतला तर, राज्यपाल हे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाचारण करु शकतात, पण मला वाटतं की फडणवीस असे करणार नाहीत, कारण 'दोन वर्ष मुख्यमंत्री राहण्यापेक्षा मी मध्यवर्ती निवडणुकीला सामोरे जाऊन स्वःबळावर निवडून येईल,'असे फडणवीस राज्यपालांना सांगतील," "दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक तृतीयांश संख्याबळ राहिले, आणि त्यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांच्यावर अधिवेशनात अविश्वासाचा ठराव मांडला जाईल," असे बापट यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT