मुंबई : ठाकरे सरकारमधील नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी बंड केल्याने ठाकरे सरकार संकटात सापडलं आहे. (deepak kesarkar latest news)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता नाकारता येत नाही, नुकतीच मंत्रीमंडळाच्या बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी "असेच सहकार्य राहू द्या," असे सांगितले आहे.
शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेने मुंबईत काही आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं होते. येथे शिवसेनेचे आमदार दीपक केसकर हेही होते. दीपक केसरकर हे काल घरी जात असताना त्यांना शिवसैनिकांनी रोखलं होतं. त्यामुळे ते चांगलेच संतप्त झाले होते. यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर केसरकर यांनी भाष्य केलं आहे.
केसकर म्हणाले, "मी सुरूवातीपासून उद्धव साहेबांना सांगतोय की आपण भाजपसोबत जायला हवं. एकनाथ शिंदे गेल्यापासूनही त्यांची भूमिका मी सीएम साहेबांना सांगतोय. भाजपसोबत जाण्याची शिंदेंची भूमिका मुख्यमंत्र्यांना सांगितली. शिंदेची तात्विक भूमिका आहे की, आपण भाजपसोबत जावे, शिंदे यांना कुठल्या पदाची अपेक्षा नव्हती,"
"शिवसैनिकांकडून माझी गाडी अडवणे, माझ्यावर पाळत ठेवणे. असले प्रकार मी अजिबात सहन करणार नाही. माझ्या घरासमोर माणसं ठेवू नका म्हणून सांगितलेले असतानाही माणसे ठेवली गेली. ही दादागिरी मी सहन करणार नाही. लोकप्रतिनिधींना सन्मान दिला पाहिजे," असे केसरकर म्हणाले. "शिवसेनेने युतीसोबत जायला पाहिजे, ही माझी सुरवातीपासूनची भूमिका आहे. या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असे मी म्हणणार नाही, " असे केसरकर म्हणाले.
शिंदे यांच्या या वेगळ्या गटाने राज्यपालांना ठाकरे सरकारचा (Thackeray government) पाठिंबा काढल्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे शिंदेकडे असलेल्या आमदारांची संख्या लक्षात घेता शिवसेना कुणाची असा सवाल विचारण्यात येत आहे. राज्यघटनेचे अभ्यासक उल्हास बापट (Ulhat Bapat) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
"शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना जर शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र मिळालं तर शिवसेनेचे कायदेशीर गटनेते हे एकनाथ शिंदे समजले जातील, असे झाल्यास कायद्यानुसार शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची समजली जाईल," असे उल्हास बापट यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.