Deepesh Mhtare : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामागे स्थानिक पातळीवरील नेतृत्व नव्हे, तर थेट पक्षातील वरिष्ठ पातळीचा हात असल्याच्या चर्चांनी सध्या कल्याण- डोंबिवलीचे राजकारण पेटले आहे. विशेषतः हा डाव भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनीच आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात डोंबिवली पश्चिमेतील म्हात्रे घराण्याचे अस्तित्व नेहमीच प्रभावी राहिले आहे. महापालिकेच्या राजकारणात तर म्हात्रे कुटुंबाचा अनेक वर्षांपासून दबदबा आहे. त्यामुळेच ठाकरे गट सोडून दीपेश म्हात्रे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करताच स्थानिक राजकीय समीकरणांना पूर्णत: नवीन वळण मिळाले.
हा प्रवेश वरकरणी भाजपसाठी बळ देणारा असला तरी या प्रवेशाच्या पडद्यामागे चाललेल्या हालचाली, त्यातून भाजपच्या गोटात निर्माण झालेली नाराजी आणि आगामी महापालिका निवडणुकीचे परिणाम यावर सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. म्हात्रे यांच्या प्रवेशाची संपूर्ण पटकथा वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या सहभागाने तयार झाल्याचे भाजपच्या अंतर्गत गोटातच कानावर येत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला स्थानिक प्रभाव असलेल्या नेतृत्वाची गरज होती. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा काही ठिकाणी टिकून असलेला प्रभाव भाजपला त्रासदायक वाटत होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हात्रे घराण्याचा भाजप प्रवेश हा फडणवीसांनी आखलेला रणनीतिक डाव असल्याचे मानले जात आहे.
कार्यकर्ते नाराज?
सगळ्या परिस्थितीत सर्वात मोठे आव्हान प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासमोर आहे. म्हात्रेच्या प्रवेशामुळे बाहेरून भाजपची ताकद वाढल्याचे चित्र जरी तयार झाले, तरी संघटनेची अंतर्गत एकजूट ढासळू नये, नाराज कार्यकर्ते तुटू नयेत आणि महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण व्हावी, यासाठी मोठी समजूतदार भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण नाराजीमुळे निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.