

Mahayuti : भाजपमध्ये सुरु असलेल्या इनकमिंगने शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या पक्षप्रवेशांचा निषेध म्हणून शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता अन्य मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली. मात्र बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये फडणवीस यांनी मंत्र्यांना झापले असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापलं :
बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यात भाजपमधील त्यात आज कल्याण-डोंबिवलीमधील इनकमिंगविरोधात तक्रार केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना उल्ल्हासनगरमधील पक्षप्रवेशाचे उदाहरण देत झापले. "तुम्ही उल्ल्हासनगरमधून सुरुवात केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे म्हणत मंत्र्यांना सुनावले. त्यानंतर फडणवीसांनी संताप आवरत यापुढे एकमेकांना प्रवेश देऊ नका, दोन्ही पक्षांनी या गोष्टी पाळाव्यात अशा सूचना दिल्या.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. अशात मंगळवारी कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेतील काही माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. याच पक्षप्रवेशानंतर शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून आली. यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून आपली नाराजी व्यक्त केली.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेला खिंडार :
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीमध्ये खिंडार पडत आहेत. पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलेले दिवंगत वामन म्हत्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही तासांतच तीन नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे यांनी पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.