Chhagan Bhujbal  sarkarnama
मुंबई

Bhiwandi OBC Melawa : "ओबीसींच्या विरोधात बोलणाऱ्यांचा कार्यक्रम करा"

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षण विरोधाला धार; मोर्चे, साखळी उपोषणाचा भुजबळांचा सल्ला

सरकारनामा ब्यूरो

Bhiwandi : मनोज जरांगे यांनी सरकारला मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंतच वेळ दिलाय. सरकारकडून देखील मनोज जरांगे यांच्याशी संपर्क साधला जातोय. मात्र, ओबीसीमधून ओबीसींच्या विरोधात बोलणाऱ्यांचा कार्यक्रम पुढच्या निवडणुकीत करा, मोर्चे मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, या मागणीसाठी आज भिवंडीत झालेल्या ओबीसींच्या सभेतकाढा, साखळी उपोषण सुरू करा, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

भिवंडीत झालेल्या ओबीसींच्या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ओबीसींच्या विरोधा बोलणाऱ्या आमदारांना देखील भुजबळांनी इशार दिला. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. ओबीसमधून त्यांना आरक्षण नको. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर ओबीसीचा जिल्हा परिषद सदस्य विसरा साधा सरपंच सुद्धा होणार नाही, असा इशारा भुजबळ यांनी दिला. तसेच आमचा विरोध हा झुंडशाही, दादागिरीला आहे. असे ठणकावून सांगितले.

आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम नाही. मागास असलेल्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे.मात्र, बाळासाहेब सराटे यांनी न्यायालयात ओबीसीला आरक्षण हे कायद्याला धरून नाही म्हणून केस केली आहे. म्हणजे आम्हाला ओबीसींमधून बाहेर काढयंच आणि मराठा समाजाला ते आरक्षण द्यायचं असा डाव आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला.

मराठा समजाला मिळणाऱ्या योजनांच्या फायदेच भुजबळ यांनी सभेत मोजून दाखवले. कोट्यावधी रुपयांच्या योजना मराठा समाजासाठी राबवल्या जात आहेत. मात्र, ओबीसींना त्या तुलनेत काहीच मिळत नाही. २७ टक्के आरक्षण असताना अवघे साडेनऊ टक्के ओबीसी हे सरकारी नोकरी आहेत. आधी त्यांचा अनुशेष भरुन काढा, असे म्हणत भुजबळांनी सरकारला ही धारेवर धरले.

आपल्या सभेत भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सासरच्या घरी भाकरी तोडतो. आमची लायकी काढतो. ओबीसीमधून आरक्षणाची तसेच पोलिस गुन्हे मागे घेण्याची जरांगे यांची मागणी बालीश असल्याची टीका भुजबळ यांनी केली. तसेच आधीच मर्कट त्यात मद्य प्याला, असे म्हणत बेवडा मारून जरांगे बोलत असल्याचे भुजबळ यांनी सुनावले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT