shahnawaz hussian sarkarnama
मुंबई

Delhi High Court : भाजपच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा होणार दाखल

Delhi High Court : छतरपूर फार्म हाऊसवर हुसैनने आपल्यावर बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला होता.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शाहनवाज हुसेन (shahnawaz hussian) यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका जुन्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) पोलिसांना शाहनवाज हुसैनविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास 3 महिन्यांत पूर्ण करण्यास सांगितले आहे.

शाहनवाज हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. छतरपूर फार्म हाऊसवर हुसैनने आपल्यावर बलात्कार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला होता. दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या खंडपीठाने पीडित महिलेने काही वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.

जानेवारी 2018 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून हुसैन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले होते.या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांची पूर्ण अनिच्छा आहे. पोलिसांनी ट्रायल कोर्टात सादर केलेला अहवाल हा अंतिम नसल्याचेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

शाहनवाज हुसैन हे बिहारचे आमदार आहेत. बिहारमधील जेडीयू-भाजप युती सरकारमध्ये ते मंत्रीही होते. शाहनवाज हुसैन हे देखील तीन वेळा खासदार राहिले आहेत. ते अटल सरकारमध्ये मंत्रीही होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT