Dhirendra Krishna Shastri Sarkarnama
मुंबई

Bageshwar Dham : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमासाठी साडेतीन कोटींची मागणी? कार्यक्रम रद्द झाल्याने घरात घुसून मारहाण

Bageshwar Dham Dhirendra Krishna Shastri : अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांनी दहा ते बारा गुंडांना सोबत घेऊन मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. तर घरातील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा आरोप.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News, 19 June : 'बागेश्वर धाम'चे प्रसिध्द कथाकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असते. अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांच्या सत्संगाचं आयोजन केलं जातं. अशातच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले.

निवडणुकीच्या काळात हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशभरात धीरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग कार्यक्रमांना मोठी मागणी होती. याच काळात राजस्थान येथे लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या अशोक शर्मा या उमेदवाराने देखील आपल्या मतदारसंघात बागेश्वर धाम यांचा सत्संग आयोजित करण्याचं ठरवलं होतं.

या सत्संगाचं आयोजन करण्यासाठी शर्मा यांनी आपल्या मित्राच्या माध्यमातून बागेश्वर धामचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी कार्यक्रमासाठी साडेतीन कोटी रुपयांची मागणी उमेदवाराकडे करण्यात आली, मात्र उमेदवाराने कार्यक्रमाला नकार देत बागेश्वर धामच्या (Bageshwar Dham) महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबतचे फोनवरील संभाषण व्हायरल केलं.

फोनवरील संभाषण व्हायरल केल्याच्या रागातून अभिजीत करंजुले आणि मयुरेश कुलकर्णी यांनी दहा ते बारा गुंडांना सोबत घेऊन मध्यस्थी करणाऱ्या मुंबईतील (Mumbai) नितीन उपाध्याय यांच्या घरात घुसून संपूर्ण कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. यावेळी त्यांनी घरातील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू दागिने लंपास केल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

या प्रकरणी अभिजीत करंजुले यांच्यासह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करूनही अध्याप आरोपींना अटक झाली नाही राजकीय दबाव असल्यामुळेच आरोपींना अटक केली जात नसल्याचा आरोप नितीन उपाध्याय यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT