Pratibha Dhanorkar Emta Coal Mining News : चंद्रपूरमधील नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासमोर त्यांच्या भावाने आणि कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे आघाडीवर होते.
काही दिवसांपूर्वीच प्रतिभा धानोरकर लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यातच भाऊ काकडे यांनी हा पराक्रम केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नेमकं काय घडलं?
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात कर्नाटक एम्टा कोळशा खाण आहे. ही खाण कर्नाटक सरकारची आहे. या खाणीतील कोळसा वाहतुकीमुळे पिकांना मोठा फटका बसू लागला आहे. त्यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना घेऊन खासदार धानोरकर खाण व्यवस्थानासोबत चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत भाऊ प्रवीण काकडे, कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त होते.
चर्चा सुरु असतानाच प्रवीण काकडे यांनी अधिकाऱ्याला विचारपूस करता-करता शिवीगाळ केली. त्याचवेळी एका व्यक्तीनं त्या अधिकाऱ्याला कानशिलात लगावली. यानंतर एकच गोंधळ उडाला. अधिकाऱ्यांना सर्वांनी शिवीगाळ करणं सुरू केलं.
तेव्हा, उपस्थित असलेल्या पोलिसांनी परिस्थितीत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण, कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त ऐकत नसल्यानं पोलिसांनी अधिकाऱ्यांना कसेबसे बाहेर काढण्यात आलं.
यासंदर्भात कर्नाटक 'एम्टा' खाण व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष जीभकाटे यांनी याप्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. असं काही घडलंच नसल्याचं जीभकाटे यांनी सांगितलं आहे.
याप्रकरणावर खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "वारंवार कंपनीला निवेदून देऊनही समस्या मार्गी लागल्या नाहीत. त्यामुळे आंदोलन करावे लागले. यापुढे असेल चालू राहिले, तर काम बंद केले जाईल," असा इशारा धानोरकरांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.