Chhagan Bhujbal - Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar & Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री अजित पवार अन् मंत्री छगन भुजबळांमध्ये 'या' मुद्द्यांवरुन उडाले खटके

NCP Politics News : भुजबळांनी 'ही' सगळी माहिती दिल्यानंतर....

Deepak Kulkarni

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात उभी फूट पडली. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ही सर्व मंडळी शरद पवारांचे निष्ठावान समजले जात होते. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांमध्ये खटके उडाल्याचे समोर आले आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच ओबीसी समाज देखी आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला'ओबीसी'तून आरक्षण देऊ नये अशी मागणी होऊ लागलेली आहे. याचवेळी ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली होती.

या बैठकीला मंत्री सुधीर मुनगंटीवार,छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी महासंघाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. याच बैठकीत अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये मतभेद झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News )

ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी बोलावलेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळांनी ज्याप्रमाणे ओबीसींना आरक्षण आहे, त्याप्रमाणात शासकीय नोकरभरती होत नसल्याचा आरोप केला. त्यांनी ओबीसी आरक्षणानुसार शासकीय नोकरीबाबत आकडेवारी सादर केली. पण ती आकडेवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावली.

भुजबळ काय म्हणाले..?

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी आरक्षण आणि शासकीय नोकरभरती यातील तफावत स्पष्ट करताना जर ओबीसींसाठी सव्वा पाच लाख जागा असतील तर त्या तितक्या भरल्या गेल्या नाहीत.उलट खुल्या प्रवर्गातून जास्त प्रमाणात भरती करण्यात आली आहे.त्यामुळे जर खुल्या प्रवर्गासाठी सव्वा पाच लाख जागा असतील तर त्या सव्वा सहा लाख कशा भरल्या गेल्या असा मुद्दा देखील भुजबळांनी मांडला.

अजितदादांनी भुजबळांचे दावे खोडले....

मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी मंत्री छगन भुजबळांचे दावे खोडून काढले.ते म्हणाले,भुजबळांनी ही सगळी माहिती दिल्यानंतर मी मुख्य सचिवांशी चर्चा केली. त्यांनी मला सगळी माहिती सुध्दा दिली. पण त्यांनी कोणत्याच पद्धतीची भरती झाली नाही.त्यामुळे या आकड्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही. तर या आकडेवारीचा तपशील आम्ही सातत्याने घेत असतो आणि ही अधिकृत आकडेवारी असल्याचं भुजबळांनी सांगितले.

 '' जेलमध्ये असताना भुजबळ पवारांना ब्लॅकमेल करत होते...''

जामिनावर सुटल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कदम म्हणाले, छगन भुजबळ जेलमध्ये असताना लवकर जामीन मिळावा, यासाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे असा मोठा गौप्यस्फोट रमेश कदम यांनी केला आहे.

रमेश कदम म्हणाले,जेलमध्ये असताना छगन भुजबळ हे नाराजी बोलून दाखवत होते. माझा जामीन लवकर झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल,असे सांगत होते. तुरुंगात असल्यावर छगन भुजबळ हे रोजच आजारी पडत होते. त्यांना रोजच उपचाराची गरज होती. पण आता छगन भुजबळ हे चांगलेच फिट आहेत असल्याचे कदम यांनी टोला लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT