Eknath Shinde Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले...

OBC Reservation : ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : आरक्षणासाठी मराठ्यांनंतर ओबीसी, धनगर, आदिवासी समाजांनी आक्रमक होत आंदोलन छेडले. या वेळी प्रत्येक समाजाची समजूत काढताना सरकारच्या नाकीनऊ आल्याचे महाराष्ट्राने पाहिले. दरम्यान, मराठा आरक्षणावरून ओबीसींच्या मनात शंका निर्माण झाली होती. त्याबाबत शुक्रवारी ओबीसी आणि अनुसूचित भटक्या विमुक्त जमाती समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक झाली. ही बैठक सकारात्मक झाली असल्याचे सांगून मराठा आणि इतर समाजांच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठे विधान केले. (Latest Political News)

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. त्यांनी सरसकट मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी सराकारला महिन्याचा वेळ दिला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यावर सरकार काम करत असल्याचे पाहून ओबीसी समाज आक्रमक झाला. आमच्या आरक्षणात कुणाला वाटेकरी करू नका, या प्रमुख मागणीसह त्यांनी ओबीसींसाठी असलेल्या योजनांतील विसंगती दुरुस्त करण्याची मागणी केली. याबाबत संबंधित शिष्टमंडळांशी शुक्रवारी सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

Eknath Shinde
Gram Panchayat Set Fire : भ्रष्टाचार पचवण्यासाठी ग्रामसेवकाने ग्रामपंचायतच पेटवली? जुने दस्त खाक...

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'गेल्या अनेक दिवसांपासून काही ठिकाणी मराठा आणि ओबीसींची आंदोलन सुरू आहेत. मराठा समाजाला जे आरक्षण देणे आहे, ते इतर आरक्षण कमी करून देणार नाही. ओबीसी किंवा इतर समाजाचे आरक्षण कमी करण्याची सरकारची कुठलीही भूमिका नाही. असलेल्या आरक्षणांना धक्का लागणार नाही.'

यानंतर पूर्वी जे आरक्षण दिले तेच मराठा समाजाला देणार असल्याचेही शिंदेंनी स्पष्ट केले. 'देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले, त्यावेळीही ओबीसींना भीती होती. मात्र, तसे न करता मराठा आरक्षण दिले. आजही तीच सरकारची भूमिका आहे. मराठा समाजाचे रद्द झालेले आरक्षण मिळवून देण्यास सरकार कटिबद्ध आहे. त्यावर कामही सुरू झालेले आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.

शिंदेंनी सांगितले, "ओबीसींच्या इतर योजनांमध्ये काही प्रमाणत विसंगती असल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. त्यावर काम करण्यात येणार आहे. ओबीसी समाजानेही चर्चेवर समाधान व्यक्त केले. मराठा समजाला मूळ आरक्षण देत असताना इतर कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी होणार नाही. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, यावर सरकार ठाम आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde
Rohit Pawar News : 'बारामती ॲग्रो'च्या प्लांटवरील कारवाई टळल्यानंतर रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com