Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar
Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar sarkarnama
मुंबई

फडणवीस नाराज नाहीत, हे मुनगंटिवारांनी छाती ठोकून सांगितले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धक्यावर धक्के पाह्यला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. त्याच बरोबर आपण स्वत: सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र, त्यानंतर काही वेळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्हिडीओ ट्वीट करत फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतील असे जाहीर केले. त्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटिवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. (Devendra Fadnavis Latest Marathi News)

यामुळे फडणवीस नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. यावर मुनगंटिवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते सत्तेसाठी काम करत नाही. देवेंद्रजींचे मन विशाल आहे. त्यामुळे पक्षाने जे सांगितले होते, तेच देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे मुनगंटिवार यांनी सांगितले. फडणवीस हे आधी बाहेर राहणार होते. मात्र, त्यांच्या पाच वर्षाचा अनुभवाचा फायदा शिंदे सरकारला व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे मुनगंटिवार यांनी सांगितले.

निर्णय बदलला नाही तर शिंदेंसोबत फडणवीस यांची जोड दिली. ते नाराज नाहीत, असेही मुनगंटिवार म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. याच बरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

''एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी पक्षाच्या आदेशाचे पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवले, त्याचा क्रम माझ्यासाठी सर्वोपरी आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ता, म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी अनुसरण करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले होते, मग पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे,'' असे ट्वीट फडणवीस यांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT