Mumbai News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटी रुपयांची ऑफर देणारी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, तिचे वडील बुकी अनिल जयसिंघानी यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. विधानसभेत हा विषय आज चर्चेला आला होता. (Designer who offered Amruta Fadnavis Rs 1 crore was detained by the police)
अनिक्षा हिला उल्हासनगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली हेाती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उल्हासनगरमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे.
दरम्यान, आमच्याबरोबर धंदा करा नाही तर माझ्या वडिलांना जेलबाहेर काढा. त्यासाठी मी तुम्हाला एक कोटी रुपये देईन, अशी ऑफर डिझायन अनिक्षा हिने अमृता फडझवीस यांना दिली हेाती. अर्थात अमृता फडणवीस यांनी ती ऑफर धुडकावून लावत तिला सुनावले होते. त्यानंतरही तिचे त्रास देणे सुरू होते, त्यामुळे अमृता यांनी मुंबईत पोलिसांत याबाबतची फिर्याद दिली होती.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत ‘पॉईंट ऑफ इन्फर्मेशन’द्वारे प्रश्न विचारला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले होते. विशेष म्हणजे अनिक्षा हिचे वडिल अनिल जयसिंघानी हे बुकी असल्याचे पुढे आले आहे.
विधानसभेत फडणवीस काय म्हणाले?
अनिल जयसिंघानी नावाची व्यक्ती गेली सात आठ वर्षांपासून फरार आहे. त्याच्यावर १४ ते १५ गुन्हे आहेत. त्याची एक मुलगी २०१५-१६ अमृता फडणवीस यांना भेटत होती. त्यानंतर तिचं येणं बंद झाला. पण, अचानक २०२१ पासून त्या मुलीने माझ्या पत्नीला भेटायला सुरुवात केली. डिझाईन, आर्टिफिशयल ज्वलेरी तयार करते. डिझाईन क्लॉथ वापरण्याची तिने अमृता यांना ऑफर केली. त्यांनीही ते वापरले. पण त्या मुलीने एके दिवशी अमृतांना सांगितले की, माझ्या वडिलांना चुकीच्या केसमध्ये अटक झाली आहे, तुम्ही त्यांना सोडवा. त्यावर अमृता यांनी सांगितले की, तुझं जे निवेदन असेल ते तू देवेंद्र फडणवीस यांना दे. हे तिने सरकार बदलल्यावर सांगितले.
माझे वडील सर्व बुकीला ओळखतात. मागील काळात आम्ही ही माहिती पोलिसांना द्यायचो आणि त्या ठिकाणी छापा टाकला जायचा. त्यावेळी आम्हाला दोन्हीकडून पैसे मिळायचे. तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही असे छापेमारी करवू शकतो. मात्र, अमृता यांनी ते स्पष्टपणे नाकारले होत. मात्र पुन्हा एकतर हा धंदा आपण करूयात, नाहीतर माझ्या वडिलांना जेलबाहेर, मी तुम्हाला एक कोटी देते, अशी ऑफर तिने माझ्या पत्नीला दिली होती. बुकींचा विषय वारंवार यायला लागल्यावर माझ्या पत्नीने त्या मुलीला ब्लॉक केले, असेही फडणवीस यांनी नमूद केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.