बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नुकताच कर्नाटक (Karnataka) दौरा केला. त्यात दौऱ्यात मंड्या येथे गुंड पीटर रवी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. याबद्दल पंतप्रधान कार्यालयाने संताप व्यक्त करत भाजपला या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. (Goon's presence at Modi's reception : Prime Minister's Office has called for a report)
पंतप्रधानांच्या स्वागत यादीत गुंड रवीचा समावेश कोणी केला? याला जबाबदार कोण?, याचा सर्वंकष अहवाल द्या, असा आदेश पंतप्रधान कार्यालयाने प्रदेश भाजपला दिला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार ही यादी कोणी तयार केली याचा शोध घेण्यासाठी भाजप नेत्यांनी झडती घेतली आहे.
मंड्याच्या स्थानिक नेत्यांनी ही यादी तयार केली असून सर्व तपशील पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. यामुळे कर्नाटकातील सत्ताधारी भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदी आणि गुंड रवी समोरासमोर उभे राहून हात जोडून एकमेकांना अभिवादन करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
विरोधी पक्ष याला मोठा मुद्दा बनवत आहेत. भाजपवरच नव्हे; तर पंतप्रधानांवरही हल्ला चढवत आहेत. बंगळूर-म्हैसूर ‘एक्स्प्रेस वे’च्या उदघाटनावेळी पंतप्रधानांच्या स्वागत समारंभावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला परवानगी दिल्याबद्दल कर्नाटक काँग्रेसने मंगळवारी सत्ताधारी भाजपविरोधात आघाडी उघडली.
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वादग्रस्त व्यक्तिला मोदींच्या स्वागताला परवानगी दिल्याने हायकमांडने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पंतप्रधानांसमोरही पेच निर्माण झाला आहे. सर्व गोष्टी जाणणाऱ्या सरकारला गुंड पीटर रवी याची माहिती कशी नाही? पंतप्रधान मोदी यांचे स्वागत कोण करणार याची यादी अगोदरच मिळते. होय ना? असे सांगत कॉंग्रेसने भाजपची खिल्ली उडवली.
भाजपवर आरोप
सत्ताधारी भाजपवर गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याचा आरोप होत आहे. भाजपचे नेते सँट्रो रवीशीही जवळीक साधत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हेही प्रकरण वादग्रस्त ठरल्याने त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. मात्र सध्याच्या घडामोडीने सत्ताधारी भाजपलाही लाजवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.