"Devendra Fadnavis confirms BJP’s involvement behind the viral Devabhau hoardings campaign in Maharashtra." Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : 'देवाभाऊ'च्या ‘त्या’ जाहिराती, होर्डिंगमागे कोण? फडणवीसांनी पहिल्यांदाच थेट नाव घेत सगळं सांगितलं...

Devabhau Hoardings Controversy Explained : महाराज आम्ही तुमचे जे मावळे आहेत, सैनिक आहेत, त्यांच्यात कुठलाही भेदभाव केला नाही. तुमच्याच विचारांवर आम्ही चाललो, एवढे या पोस्टरमधून दर्शविले आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Rajanand More

Maharashtra politics news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाल्या होत्या. अनेक शहरांमध्ये जाहिरातीतील फोटोंचे होर्डिंग लावण्यात आले होते. पण या जाहिराती कुणी दिल्या, होर्डिंगमागे कोण? याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. जाहिरतींसह होर्डिंगवर केवळ ‘देवाभाऊ’ असे लिहिले होते. त्यावर कुणाचेही नाव नव्हते. अखेर फडणवीसांनीच थेट नाव घेत त्यामागची सगळी स्टोरी सांगितली आहे.  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर फडणवीस फुले अर्पण करत असल्याच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाल्या होत्या. त्याचे होर्डिंगही लागले होते. त्यावर फडणवीस यांनी गुरूवारी पहिल्यांदाच खुलासा केला आहे. एक पोस्टर किती पॉवरफुल स्टेटमेंट करू शकतो, हे यावरून दिसते. पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर मी फुले टाकत आहे आणि देवाभाऊ एवढेच लिहिले आहे. त्यावर मी महान आहे किंवा स्तुती असे काहीच नाही. तरीही काही लोकांना मिरची लागली. त्यावर वादही निर्माण करण्यात आला, असे फडणवीस म्हणाले.   

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत माझ्या पक्षाने हे पोस्टर लावले, असे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, या पोस्टरचा अर्थ एवढाच आहे की, मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू होता. मराठा समाजाचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान मानले जाते. महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहासात ते खूप महत्वाचे आहे. ते आरक्षण मागत असताना आम्हाला निर्णय घ्यायचा होता. यावेळी इतर समाजातील लोकांच्या मनात शंका होती की, आमचे आरक्षण कमी करून तर देत नाहीत ना?

छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना सोबत घेत सैन्य तयार केले होते. मी एकाचे काढून दुसऱ्याला दिले तर ते शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणार नाही. आम्ही जो निर्णय घेतला, त्याने ओबीसी आरक्षणातून कुणाला आरक्षण दिले नाही. मराठा समाजाचा प्रश्नही सोडवला, असे फडणवीस म्हणाले.

महाराज आम्ही तुमचे जे मावळे आहेत, सैनिक आहेत, त्यांच्यात कुठलाही भेदभाव केला नाही. तुमच्याच विचारांवर आम्ही चाललो, एवढे या पोस्टरमधून दर्शविले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पोस्टरवर केवळ देवाभाऊ असे लिहिले होते. देवेंद्र फडणवीस असे नाव नव्हते, याबाबतही खुलासा करताना ते म्हणाले, मागील काही वर्षांत देवाभाऊ हे माझ्याविषयी कॉमन नाव झाले आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला असे वाटले की देवाभाऊ लिहावे, म्हणून त्यावर देवाभाऊ लिहिले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT