
नवीन नियम बदल: निवडणूक आयोगाने ठरवले आहे की टपाली मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय ईव्हीएम मतमोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्या सुरू होणार नाहीत.
टपाली मतांची वाढ: दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची सोय सुरू केल्याने टपाली मतांची संख्या वाढली आहे.
पारदर्शकतेसाठी पाऊल: प्रत्येक मत योग्यरित्या मोजले जावे, कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्रक्रिया व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.
Completion of Postal Ballot Process Before EVM/VVPAT Counting : भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी सातत्याने विविध बदल केले जात आहेत. आता टपाली मतमोजणीबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक निवडणुकांमध्ये टपाली मतदानावरून घोळ झाल्याचे आढळून आले आहे. मतमोजणीच्या अखेरपर्यंत टपाली मतदानावरून उमेदवार आमनेसामने उभे ठाकलेले असतात. आता आयोगाने मतमोजणीच्या नियमात बदल केला आहे.
निवडणूक आयोगाकडून याबाबतची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. आयोगाने म्हटले आहे की, मतमोजणीच्या दिवशी टपाली मतदानाची मोजणी सकाळी 10 वाजता सुरू होते. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता ईव्हीएम मधील मतांची मोजणी सुरू केली जाते. यापूर्वी ईव्हीएमची मोजणी टपाली मतमोजणीच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू ठेवली जात होती.
आयोगाने मागील काही निवडणुकांपासून दिव्यांग आणि 85 वर्षांपूढील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी जाऊन मतदान घेण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे. ही मतेही टपाली मतांमध्ये ग्राह्य धरली जातात. त्यामुळे टपाली मतांची संख्या वाढली आहे. परिणामी टपाली मतमोजणीआधी ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. असे आयोगाने म्हटले आहे.
आता याबाबत आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. टपाली मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय ईव्हीएम मतमोजणीच्या अखेरच्या दोन फेऱ्यांची मतमोजणी सुरू होणार नाही, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ईव्हीएम मतमोजणीच्या अखेरच्या दोन फेऱ्या शिल्लक असताना टपाली मतमोजणी सुरू असल्यास ईव्हीएमची मतमोजणी थांबविली जाईल. टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएमच्या राहिलेल्या दोन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होईल. मतमोजमीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि एकरूप होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रत्येक मताची मोजणी योग्यप्रकारे आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय व्हावी, हे अपेक्षित असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
टपाली मतमोजणी वेळेत पूर्ण व्हावी, त्याला विलंब लागू नये, यासाठीही निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. टपाली मतांची संख्या अधिक असल्यास त्याठिकाणी योग्य प्रमाणात टेबल्स आणि मतमोजणी करणाऱ्यांची पुरेशी संख्या उपलब्ध असायला हवी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
Q1: याआधी नियम काय होता?
A: ईव्हीएम मोजणी टपाली मतमोजणीच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू ठेवता येत होती.
Q2: नवीन नियम कधीपासून लागू होईल?
A: आगामी निवडणुकांपासून लागू होईल.
Q3: टपाली मतदानात कोण सहभागी होऊ शकतात?
A: दिव्यांग, ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि काही विशेष श्रेणीतील मतदार.
Q4: आयोगाने आणखी काय सूचना दिल्या?
A: जास्त टपाली मते असतील तर अधिक टेबल्स आणि कर्मचारी नियुक्त करावेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.