Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar On CM Post : 'फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत,' बावनकुळेंच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांनी सुचवला अजब फॉर्म्युला!

Vijay Wadettiwar On Chandrashekhar Bawankule : "आलटून-पालटून मुख्यमंत्री करा..."

Chetan Zadpe

Vijay Wadettiwar On Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे मुख्यमंत्री व्हावेत, ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता पलटवार केला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री पदावरून महायुतीसोबतच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत. (Latest Marathi News)

नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार हे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे वक्तव्य केले होते. यावर बावनकुळे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस काय म्हणाले मला माहिती नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतं की, फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना, समर्थकांना वाटतं फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत." बावनकुळेंच्या याच वक्तव्यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

वडेट्टीवार म्हणाले, "बावनकुळेंच्या तोंडातून कधी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असे शब्द बाहेर पडतात. कधी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार म्हणतात. आता यांच्याकडे आम्ही एक यादी देणार आहोत. १५ लोकांना आलटून-पालटून मुख्यमंत्री करतो, असे म्हणत राहा म्हणजे सर्वांचं समाधान होईल, असा अजब फॉर्म्युला वडेट्टीवारांनी दिला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT