Devendra Fadnavis and Uddhav Thackeray meeting
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray meeting Sarkarnama
मुंबई

Thackeray And Fadnavis meeting : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर शिंदे गटाची मवाळ प्रतिक्रिया; म्हणाले, आमचं भांडण...

Jagdish Patil

Mumbai News, 27 June : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते एकाच लिफ्टमधून विधानभवनात गेले. लिफ्टमध्ये जाताना दोघांमध्ये संवादही झाला. या दोघांच्या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या दोन नेत्यांच्या भेटीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मात्र सावध आणि मवाळ प्रतिक्रिया दिली आहे. ही भेट काही गैर नाही, आमचं ठाकरेंशी वैयक्तिक भांडणं नाही, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. (Devendra Fadnavis and Uddhav Thackeray meeting)

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Uddhav Thackeray and Devendra Fadnavis) यांच्या भेटीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय शिरसाट म्हणाले, "आज उद्धवसाहेब आणि देवेंद्र फडणवीसांनी लिफ्टमधून प्रवास केला. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, आमची काही वैयक्तिक भांडणं नाहीत, मात्र, राऊतांसारखे काही लोक उद्धवसाहेबांना मिस गाईड करत आहेत, याचा प्रत्येय त्यांना आला असावा.

राजकीय भांडण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगळे असतात. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे राजकारणात तुमचे कधीही मनभेद नसावेत. या भेटीला मी गैर समजत नाही, ही अत्यंत चांगली भेट झाली." शिरसाटांच्या या प्रतिक्रियेमुळे आता शिंदे गटाने ठाकरेंबाबत मवाळ भूमिका घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे-शिंदे गट किंवा भाजप आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून मुंबईत सुरुवात झाली. हे अधिवेशन महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात विरोधक महायुती सरकारला घेरणार, सरकारची कोंडी करणार असं बोललं जात होतं. शिवाय आघाडीच्या काही नेत्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेधही केला. मात्र, राजकीय विरोधकांच्या भेटीमुळे आता अधिवेशनातील एक वेगळं चित्र पाहायला मिळालं.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दानवे यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे आणि अनिल परब हेदेखील उपस्थित होते. चंद्रकांतदादांनी दानवे यांना एक चॉकलेट दिलं तर दानवे यांनी पाटील यांच्यासमोर पेढ्याचा बॉक्स धरला. त्यामुळे अधिवेशानाच्या पहिल्याच दिवशी दररोज एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या भेटीमुळे, राजकारणात कुणीही कुणाचं वैयक्तिक शत्रू नसतं, याचा संदेश लोकांमध्ये गेला हे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT