Rohit Pawar : ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा! राऊतांच्या दाव्यावर रोहित पवारांचा आक्षेप; म्हणाले, पदासाठी लढण्यापेक्षा...

Sanjay Raut About Uddhav Thackeray face of Chief Ministership : "विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना राज्यात आघाडीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा लागेल. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसेल तर बिन चेहऱ्याची निवडणूक लढवता येणार नाही."
Sanjay Raut,  Rohit pawar, Uddhav Thackeray
Sanjay Raut, Rohit pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 27 June : विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना राज्यात आघाडीला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा द्यावा लागेल. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसेल तर बिन चेहऱ्याची निवडणूक लढवता येणार नाही. शिवाय राज्यातील जनेतेने उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे.

त्यामुळे ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करावं, असा अप्रत्यक्ष दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. मात्र, 'पदासाठी लढण्यापेक्षा विचारांसाठी लढावं', असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. शिवाय राज्यातील जनतेचा महायुती सरकारवर रोष असल्याचंही आघाडीकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही राज्यातील जनता आघाडीला पसंती देईल असा दावा आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.

अशातच आता महाविकास आघाडी म्हणून राज्यात निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यायला पाहिजे असं मतं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं आहे. शिवाय हे सांगताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच चेहरा या पदासाठी द्यावा अशी अप्रत्यक्षरित्या मागणीदेखील केली.

Sanjay Raut,  Rohit pawar, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : अधिवेशन वादळी होणार! शेवटच्या दिवशी येणारे उद्धव ठाकरे पहिल्याच दिवशी 15 मिनिटे आधी हजर

राऊत म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसेल तर बिन चेहऱ्याची निवडणूक लढवता येणार नाही. महाराष्ट्राने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री केलेल्या नेतृत्वाचा परिणाम आहे. महाविकास आघाडी एकत्र असेल तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पाहावा लागेल."

Sanjay Raut,  Rohit pawar, Uddhav Thackeray
Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्य सरकारची नजर राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवर, विधानसभेपूर्वी हालचालींना वेग

राऊतांच्या वक्तव्यावर रोहित पवारांचा आक्षेप

राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पदासाठी लढण्यापेक्षा विचारांसाठी लढावं असं म्हणत रोहित पवारांनी त्यांच्या मागणीवर आक्षेप घेतला. ते म्हणाले, "ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही पण ही लढाई स्वाभिमानाची लढाई आहे.

सामान्य माणसांच्या हिताचं सरकार या महाराष्ट्रात आणण्याची ही लढाई आहे. तसंच पदासाठी लढण्यापेक्षा विचारांसाठी लढत या राज्यातून भाजपला हद्दपार करण्याची वेळ आली आहे." त्यामुळे अद्याप तरी ठाकरेंना मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा करावा यासाठी आघाडीतील नेत्यांचं एकमत नसल्याचं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com