Devendra Fadnavis News : Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis News : '..अर्धवटराव, स्क्रिप्ट रायटर बदला' ; फडणवीसांचा ठाकरेंवर खोचक निशाणा !

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : कोरोना लसीच्या मुद्द्यावरून फडणवीस-ठाकरे आमने सामने..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे काल (दि.१९ जून) पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय फटकेबाजी करत शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या 'मोदींनी लस तयार केली' या वक्तव्याचा समाचार घेतला होता. आता यावर फडणवीसांनी ट्विट करत पुन्हा ठाकरेंवर पलटवार केला आहे. (Latest Marathi News)

अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो? ते पूर्ण ऐकलंच नाही, असं ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'अर्धवटराव, मी काय म्हणालो होतो, ते पूर्ण ऐकलेच नाही... असो, आता ऐका...याच अर्धवटपणामुळे तुम्हाला पानिपत शब्द अलिकडे अधिक आठवायला लागला ...म्हणून म्हणतो स्क्रिप्ट रायटर बदला ! ' असं ट्विट करून त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस तयार केली,असे वक्तव्य केले होते. मोदींनी कोरोनाप्रतिबंधक लस तयार केल्यामुळे कोट्यवधी लोक जिवंत असल्याचं फडणवीस म्हणाले होते.

यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतला होता. फडणवीसांच्या या दाव्यावर ठाकरे म्हणाले, "आज हास्यजत्रेचा प्रयोग झाला. पण काल फडणवीसांचा एक प्रयोग झाला, कुठून यांच्या डोक्यात व्हायरस घुसलाय तेच कळत नाही, कोव्हीडची लस कुणीतरी तयार केली, मग बाकीचे गवत उपटत बसले होते?" अशा शब्दात ठाकरेंनी फडणवीसांवर सडकून टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT