Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Sarkarnama
मुंबई

सहानुभुती मिळावी म्हणून ठाकरे सरकारनं असं केलं ; सोमय्यांच्या हल्ल्यावर फडणवीस संतप्त

सरकारनामा ब्युरो

-अक्षय बडवे

पुणे : राणा दाम्पत्यास खार पोलिस ठाण्यात भेटायला गेलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर हल्ला करण्यात आला. याल्ल्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर आगपाखड केली आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''खासदार नवनीत राणा यांना भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात येतोय, हे किरीट सोमय्या यांनी पोलिसांना कळविले होते, तरीही पोलिस ठाण्याच्या बाहेर ७० लोक उभी होती. त्यावेळी सोमय्यांवर हल्ला होतो. ही लाजिरवाणी स्थिती आहे, हे सगळ्यात वाईट पर्व आहे. सहानुभुती मिळावी म्हणून हे सगळं करण्यात आले,''

''एका महिलेला रात्री तुरुंगात टाकलं. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, भाजप संघर्ष करणारी पार्टी आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आम्ही करणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देऊ. आम्ही देशाच्या ४७ टक्के गुंतवणूक राज्यात आणली होती. तुम्ही जर रोज घोटाळे करणार असणार तर तुमच्याकडे कोण येणार,''असा टोला फडणवीसांना लगावला.

''खासदार नवनीत राणा यांना भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात येतोय, हे किरीट सोमय्या यांनी पोलिसांना कळविले होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे. हल्ला होणार, हे सुद्धा त्यांनी आधीच पोलिसांना सांगितले होते. असे असताना पोलिसांनी खबरदारी घेतली नाही.पोलिसांच्या मदतीने ही गुंडगिरी सुरू आहे,''असे टि्वट फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''या घटनेने मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालविली आहे.हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात कठोर कारवाईची आमची गृहमंत्री आणि गृहसचिवांकडे मागणी आहे. आम्ही घाबरून जाऊ असे समजू नका. जशाच तसे उत्तर उत्तर देण्याची आमचीही क्षमता आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे ,''

किरीट सोमय्या काल रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी मोठा दगड फेकला. यात त्यांच्या गाडीची काच फुटून काचांचे तुकडे त्यांच्या हनुवटीवर लागले. पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांवरती दुसऱ्यांदा हल्ला केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT