धक्कादायक : अमरावतीत शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर गोळीबार

योगेश घारड यांना उपचारासाठी नागपुर येथे हलवण्यात आले आहे.
yogesh gharad
yogesh gharad sarkarnama
Published on
Updated on

अमरावती : मुंबईत राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना, शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या असा राडा सुरु असताना अमरावतीमध्ये (amravati) शिवसेना (shivsena) पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अमरावती शहराच्या वरुडमध्ये काल (शनिवारी) रात्री नऊ वाजेदरम्यान हा गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर वरुड शहरामध्ये कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश घारड (yogesh gharad ) यांच्यावर हा हल्ला करण्यात आला असून, त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.या हल्ल्यात घारड यांच्या मांडीला गोळी लागली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. योगेश घारड यांना उपचारासाठी नागपुर येथे हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.

yogesh gharad
कलम ३७०, तोंडी तलाकनंतर मोदी सरकार 'हा' कायदा लवकरच लागू करणार ; ब्ल्यूप्रिंट तयार

जागेच्या जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. योगेश घारड यांच्यावर हा हल्ला का करण्यात आला,याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या हल्यात राहुल तडस याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. योगेश घारड यांच्यावर मूलताई चौकात काल रात्री ९ च्या सुमारास हा गोळीबार झाला.

yogesh gharad
सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीस म्हणाले,'जशास तसे उत्तर देणार'

सुरुवातीला हा हल्ला अज्ञातांनी केला असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्यानंतर हा हल्ला राहुल तडस नावाच्या एका व्यक्तीने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. गोळीबारानंतर हल्लेखोराचा पाठलागही करण्यात आला. योगेश घारड यांच्यासोबत असणारे नंदू काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्लेखोरोचा पाठलाग करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण हल्लेखोर पसार झाला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com