Devendra Fadanvis & Uddhav Thackrey Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : भाजप-शिवसेना युती का तुटली? फडणवीसांनी सांगितली ठाकरेंची 'ती' एक चूक

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : शिवसेना भाजप युती नेमकी का तुटली हे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या एका चूकीवर बोट ठेवलं आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics | राजकीय इतिहासात कधीही घडल्या नसतील अशा घडामोडी मागील काही वर्षांत महाराष्ट्रात घडल्या. त्यापैकीच एक म्हणजे २०१४ साली भाजप व शिवसेना युती तुटली आणि त्यातून अनेक नवीन राजकीय समीकरणे उद्यास आली. ही युती का तुटली होती यावर अनेक वेगवेगळे दावे सातत्याने केले जातात. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आठवण करुन देत त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं आहे.

शिवसेना भाजप युती नेमकी का तुटली हे सांगताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या एका चूकीवर बोट ठेवलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यावेळी पडद्या मागे नेमकं काय घडलं होतं? याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.

फडणवीस म्हणाले, 2014 साली विधानसभा निवडणुकीत आम्ही शिवसेनेला 147 जागा देण्यास तयार झाला होतो. मुख्यमंत्रीही त्यांचाच होणार होता पण, नेमकी माशी कुठे शिंकली हे त्यांनी सांगितलं.

फडणवीस म्हणाले, सत्ता आल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल हे देखील ठरलं होतं. शिवसेना 147 व भाजप 127 जागा लढणार असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव होता, मात्र उद्धव ठाकरे 151 जागांवर अडून बसले होते.

मग त्यावर अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत बोलणं केलं आणि तेव्हा ठरलं की आम्ही 127 आणि ते 147 जागांवर लढतील, असा फॉर्म्युला मान्य असला तरच युती होईल. तो उद्धव ठाकरे यांनी मान्य केला नाही आणि युती तुटल्याचे फडणवीसांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना सांगितले की, आम्हाला आम्ही लढू शकतो असा विश्वास होता आणि त्या जोरावरच आम्ही शिवसेनेला अल्टीमेटम दिला व आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं. 147 वर तुम्ही लढणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही 127 जागा लढू. दोघांचेही मिळून 200 च्या वर आमदार निवडून येतील. तुमचा मुख्यमंत्री बनेल आणि आमचा उपमुख्यमंत्री बनेल. मात्र त्यांनी आपल्या मनात 151 चा आकडा पकडला होता. त्यामुळे शिवसेनेने आमचा प्रस्ताव स्वीकारला नाही.

फडणवीस म्हणाले, विधात्याच्या मनात काही वेगळंच होतं, मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रेडिबिलिटीमुळे आम्ही पहिल्यांदाच 260 जागा लढलो. त्याआधी आम्ही 117 पेक्षा जास्त जागा लढलो नव्हतो. आम्ही 260 जागा लढलो आणि सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभा राहिलो. तेव्हापासून आजपर्यंत शंभर पार करणारी महाराष्ट्रातील मागील 30 वर्षातील ही एकमेव पार्टी आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT