Bjp-Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Breaking: फडणवीसांची 'सीएम' पदासाठी फिल्डिंग? दिल्लीत दाखल होताच घेतली 'या' दोन बड्या नेत्यांची भेट

Mahayuti Politics : महाराष्ट्रासाठी महायुतीच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहर्‍यावर आणि दोन उपमुख्यमंत्र्‍यांच्या नावावर दिल्लीत होत असलेल्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.तसेच महायुती सरकारमधील मंत्रि‍पदांबाबतही महत्त्वाची चर्चा या बैठकीत अमित शाहांसोबत होण्याची शक्यता आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News : राज्यात महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतरही सहा दिवस उलटूनही अद्याप सत्तास्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही.तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा चेहराही निश्चित करण्यात आलेला नाही.त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. पण आता महायुतीच्या प्रमुख नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दिल्लीत गुरुवारी (ता.28) रात्री उशिरा बैठक होत आहे.

या बैठकीआधी मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिल्लीत दाखल होताच भाजपच्या बड्या नेत्याची भेट घेतली आहे. तसेच अजित पवारांचीही भेट घेतली असल्याची अपडेट समोर आली आहे.

महाराष्ट्रासाठी महायुतीचा मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहर्‍यावर आणि दोन उपमुख्यमंत्र्‍यांच्या नावावर दिल्लीत होत असलेल्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.तसेच महायुती सरकारमधील मंत्रि‍पदांबाबतही महत्त्वाची चर्चा या बैठकीत अमित शाहांसोबत होण्याची शक्यता आहे. पण आता या बैठकीआधीच भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत पोहचताच केंद्रीय पर्यावरणमंत्री आणि महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आहे.आणि त्यानंतर अजित पवारांचीही भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.या दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबतच्या बैठकीसाठी महायुतीचे तीनही प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यात अजित पवार यापूर्वीच दिल्लीत दाखल झालेले असून फडणवीस हे आज दुपारी दिल्लीसाठी रवाना झाले होते. तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दिल्लीत पोहचणार आहे. या नेत्यांची रात्री उशिरा शाहांसोबत बैठक होणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत आल्यानंतर फडणवीस थेट महाराष्ट्र भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येत आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये महायुतीच्या बैठकीआधी महत्त्वाची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.थोड्याच वेळात आता महायुतीची बैठक होणार आहे.

महायुतीला विधानसभा निवडणुकीत 230 जागा मिळाल्या आहेत.त्यात भाजपाला 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा 100 च्या वर जागा मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. मात्र याबाबतची घोषणा अद्याप झालेली नाही.

महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदी आणि अमित शाह हे जो निर्णय घेतील तो मान्य असेल. जे नाव जाहीर केलं जाईल, त्या नावाला शिवसेना म्हणून आमचा पाठिंबा असेल असं जाहीर केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT