Lok Sabha Election Explained : लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्या असल्यातरी राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. लोकांनी सर्वात जास्त मते महायुतीच्या उमेदवारांना दिलेली आहेत. आपल्या 11 उमेदवारांचा पाच टक्क्यांहून कमी मतांनी पराभव झाला आहे. मित्र पक्षांनी इमानदारीने काम केल्याचे दिसून आले. शिंदे गटास मिळालेल्या 7 जागांपैकी 5 जागा भाजपमुळेच मिळाल्या आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील मेळाव्यात फडणवीसांनी Devendra Fadnavis भाजपच्या नेत्यांना पराभवाने खचून न जाता उमेदीने कामाला लागण्याचा संदेश दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार, पदाधिकऱ्यांचे लोकसभेत चांगले काम केल्याबद्दलही कौतुक केले. ते म्हणाले, पराभवानंतर कुणी काहीही चर्चा घडवून आणत असेल, मात्र भाजपची मदत आपल्या मित्र पक्षांना झालेली आहे. त्यांचीही मदत आपल्याला झालेली आहे. शिवसेनेच्या सात जागा निवडून आल्या आहेत. त्यातील पाच जागांवर भाजपच्या मतांचा चांगला परिणाम दिसत आहे.
हातकणंगलेत धैर्यशील मानेंचा 13 हजार मतांनी विजय झाला. या विजयात इचलकरंजीतील 45 हजारांचे मताधिक्य मोलाचे ठरले. बुलढाण्यात संजय कुटे आणि आकाश फुंडकर यांनी केलेल्या कामाची पावती शिंदे गटास मिळाली. मावळमध्ये श्रीरंग बारणेंच्या विजयात भाजपचे पनवेल आणि चिंचवडच्या आमदारांनी चांगली कामगिरी केली. छत्रपती संभीजीनगरमध्ये भाजपने जोर लावल्यानेच संदिपान भुमरेंचा विजय झाला, असा दावाही फडणीसांनी केला.
वायव्य मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकरांचा फक्त 48 मतांनी विजय झाला आहे. त्यांना त्यांच्याच जोगेश्वरी मतदारसंघातून कमी मते मिळाली आहेत. मात्र भाजपचे आमदार अमित साटम आणि मुरजी पटेल यांनी अंधेरीतून मोठे मताधिक्य दिले. तसेच अजित पवार गटाचे सुनील तटकरेंचा विजय पेणमधून चांगली मते मिळाल्यानेच सुकर झाला, याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधले. दरम्यान, कल्याणमधील श्रीकांत शिंदेंच्या मताधिक्यात रवींद्र चव्हाण, मनसेचे राजू पाटील यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.